Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीत साईबाबांच्या चरणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि सेवाभाव असतो. याच श्रद्धेचा प्रत्यय देणारी एक प्रेरणादायी घटना सोमवारी श्री साईबाबा मंदिर परिसरात घडली. एका महिला साईभक्तीने कोणताही मोह न बाळगता ₹१५,४१० रोख रक्कम असलेली पर्स संरक्षण विभागाकडे जमा केली आणि संस्थानच्या तत्परतेमुळे काही वेळातच ती पर्स तिच्या मूळ मालकाच्या हाती सुखरूप पोहोचली.
सध्या शिर्डीत गुरुपौर्णिमा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून उद्यापासून महोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी आहे. अशा गर्दीतही प्रामाणिकपणा आणि मानवतेचा आदर्श घालून देणारी ही घटना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
मंदिरातील पारायण कक्षात पारायण करत असताना सौ. अनुपमा निरंजन (रा. बेंगळुरू) यांना एक पर्स आढळली. पर्समध्ये ₹१५,४१० रोख रक्कम, आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रे होती. कोणत्याही प्रकारचा मोह न बाळगता त्यांनी ती पर्स तात्काळ श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


संरक्षण विभागाने तत्काळ पर्समधील आधार कार्डच्या आधारे चौकशी सुरू केली. संबंधित पर्स श्री जी. व्ही. राजू (रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) यांची असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मंदिर परिसरात उद्घोषणा करण्यात आली. काही वेळातच श्री. राजू संरक्षण कार्यालयात दाखल झाले. आवश्यक पडताळणी पूर्ण करून त्यांना त्यांची पर्स आणि त्यातील संपूर्ण ₹१५,४१० रोख रक्कम सुरक्षितपणे सुपूर्त करण्यात आली.
हरवलेली पर्स परत मिळाल्याने श्री. राजू यांनी सौ. अनुपमा निरंजन आणि श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागाचे मनापासून आभार मानले. एका साईभक्ताच्या प्रामाणिकपणामुळे दुसऱ्या साईभक्ताच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला आणि साईबाबांनी दिलेल्या श्रद्धा, सबुरी, सचोटी आणि मानवतेच्या संदेशाचा जणू प्रत्यक्ष अनुभव सर्वांना आला.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी सौ. अनुपमा निरंजन यांचा सत्कार करून त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.


₹८५ लाखांहून अधिक किमतीच्या वस्तू परत करून जपला विश्वास
श्री साईबाबा संस्थानचा संरक्षण विभाग केवळ सुरक्षा व्यवस्थेपुरता मर्यादित नसून भाविकांच्या विश्वासाचेही रक्षण करत आहे. आजपर्यंत विभागाने सुमारे ₹८५ लाखांहून अधिक किमतीची रोख रक्कम, दागिने, मोबाईल, घड्याळे, महिलांच्या पर्स आणि इतर मौल्यवान वस्तू शोधून त्यांचे मूळ मालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवल्या आहेत. संरक्षण विभागाच्या या सेवाभावी कार्याचे विविध प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी कौतुक केले आहे.


संरक्षण विभाग प्रमुख श्री. रोहिदास माळी यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचारी मंदिर परिसर, भक्तनिवास आणि संस्थानच्या विविध ठिकाणी सापडलेल्या हरवलेल्या वस्तू शोधून त्या संबंधित भाविकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचा प्रत्येक कर्मचारी साईभक्तांना सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी दर्शनाचा अनुभव देण्यासाठी समर्पित भावनेने सेवा बजावत आहे.
“साईसेवा म्हणजेच मानवसेवा” या ब्रीदवाक्याला साजेशी ही घटना केवळ हरवलेली पर्स परत मिळाल्याची नाही, तर प्रामाणिकपणा, विश्वास आणि सेवाभावाचा जिवंत संदेश देणारा आणखी एक प्रेरणादायी अध्याय ठरला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button