Letest News
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्तीचा महासागर-लाखो साईभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट ... साईचरणी नतमस्तक झाले अभिनेते सोनू सूद-गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले समाधीचे दर्शन गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर ११३ साईभक्तांचे महादान रक्तदानातून मानवतेची खरी सेवा परवाना की गैरवापर? माजी उपसरपंचांशी संबंधित असल्याची चर्चा असलेल्या क्लबवर पोलिसांची कारवाई शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ...
राजकीयशिर्डी

शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश

शिर्डी (प्रतिनिधी) — शिर्डी येथील उद्योजक सुनिल सोनवणे यांची कन्या, शिर्डीची भूमिपुत्र डॉ. सृष्टी सोनवणे हिने एमबीबीएस परीक्षेत उच्च श्रेणीत यश संपादन करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत असून विविध ठिकाणी तिचा सत्कार करण्यात येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


डॉ. सृष्टी सोनवणे हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तिच्या या यशामुळे शिर्डी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरत आहे. वैद्यकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत समाजसेवेची भावना जपण्याचा तिचा संकल्पही कौतुकास्पद आहे.

kamlakar


या यशात तिच्या कुटुंबियांचे मोठे योगदान असून विशेषतः वडील सुनिल सोनवणे यांचे मार्गदर्शन व आईचे पाठबळ तिला लाभले. यावेळी तिच्यासमवेत सोनाली सोनवणे यांचीही उपस्थिती होती.
डॉ. सृष्टी सोनवणे हिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button