Letest News
शिर्डी नगरपरिषद निवडणूक 2025 — विखे घराण्याच्या रणनीतीबाबत चर्चांना उधाण! ६० टक्के नवीन चेहरे — नागर... प्रभाग क्रमांक २ मध्ये “अमृत गायके” यांच्या नावावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ! शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ — प्रभाग ५ मध्ये “नितीनभाऊ शेजवळ” यांच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा! शिर्डी नगरपरिषद निवडणूक २०२५ — प्रभाग क्रमांक १ मध्ये “संदीप भाऊ सोनवणे” यांच्या नावावर जनतेचा विश्व... प्रभाग क्रमांक २ मधून सौ. शोभाताई राजेंद्र कोते पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा राहात्यात धाडसी चोरी! – पान दुकानाचे शटर फोडून दोन लाखांहून अधिक रक्कम लंपास इंजेक्शनकांड भाग–२ “सावळीविहीर येथील डॉक्टराची जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने घेतली गंभीर दखल ? शिर्डी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक १ मध्ये संदीप भाऊ सोनवणे यांच्या उमेदवारीची ज... आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शांततेत निवडणूक पार पाडावी — निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर साई संस्थान कर्मचाऱ्यांच्या गाड्या आता रस्त्यावर — सुरक्षा धोक्यात!
Blog

साई संस्थान मध्ये सलग दहा वर्ष सेवा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गोषवारा व जेष्ठता यादी काढणार! न्यायालयाचे आदेश

शिर्डी (प्रतिनिधी )माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साई संस्थांनमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हजर दिवसाचा गोषवारा, जेष्ठता यादी प्रसिद्ध करण्याबाबत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांनी 17 डिसेंबर 2023 रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध केले असून या परिपत्रकात म्हटले आहे की, संस्थानच्या तदर्थ समितीचे 12 एप्रिल 2023 रोजीचे सभेतील निर्णय क्रमांक 274 नुसार संस्थान कंत्राटी कर्मचारी (598) यांना संस्थान सेवेत नियमित नेमणूक देऊन वेतनश्रेणी लागू करण्यास मान्यता मिळण्यास माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल करण्यात आलेल्या सिविल एप्लीकेशन मध्ये मान.उच्च न्यायालयाने 1/11/ 2023 रोजी च्या आदेशात मागील सलग संस्थांनमध्ये दहा वर्ष काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा विचारात घेतली जाईल असे नमूद आहेत. त्या अनुसरून दिनांक एक नोव्हेंबर 2013 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सलग दहा वर्ष कामावर कार्यरत कर्मचाऱ्यांचा हजर दिवसांचा गोषवारा व सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 ऑक्टोबर 2023 अखेर दहा वर्ष सलग अखंडित सेवा ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्या कर्मचाऱ्यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. सलग दहा वर्ष काम केलेले मयत सेवानिवृत्त व काम सोडून गेलेले कर्मचाऱ्यांचीही संस्थान याद्यी प्रसिद्ध करण्यात येत आहे .प्रसिद्ध करण्यात आलेल्या हजर दिवसांचा गोषवारा आणि जेष्ठता यादीमध्ये प्रसिद्धीनंतर नवीन माहिती निदर्शनास आल्यास दुरुस्ती करून ती अंतिम करण्याचा अधिकार संस्थान प्रशासनाने राखून ठेवलेला आहे. तसेच सदरची माहिती उच्च न्यायालयाच्या या संदर्भात दाखल कोर्ट केस मध्ये होणाऱ्या आदेशास अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. माननीय उच्च न्यायालयाचे यासंदर्भात होणाराआदेश सर्व कर्मचाऱ्यांवर बंधनकारक राहील. सदरहू ही माहिती संस्थांनच्या प्रशासकीय कार्यालयात कामगार विभाग व संस्थांनच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे .सदर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती आणि ज्येष्ठता यादीमध्ये काही हरकत असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांनी विविध पुराव्यांसह ,आधारासह प्रसिद्धीच्या दिनांक पासून 21 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात सादर करावयाची आहे. त्यासाठी स्वतंत्र कुठल्याही पत्रव्यवहार केला जाणार नाही. तसेच मुदतीनंतर येणाऱ्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी .सर्व अधिक्षक, विभाग प्रमुख यांनी आपल्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या पदाची माहिती संस्थान संकेतस्थळावर उपलब्ध असल्याबाबत सदर परिपत्रकाची समज देऊन त्यांची स्वाक्षरी घ्यावी .गरजेनुसार संकेतस्थळावर असलेली माहिती डाऊनलोड करून उपलब्ध करून द्यावी .असे या परिपत्रकात म्हटले आहे. या परिपत्रकामुळे संस्थांनमध्ये सलग एक नोव्हेंबर 2013 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सलग दहा वर्ष कंत्राटी सेवा केलेल्या कामगारांमधून समाधान व्यक्त होत असून एक आशा निर्माण झाली आहे. व तशी चर्चा सध्या या कामगारांमध्ये होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button