Letest News
जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स... शिर्डीत वारंवार वीज खंडितीविरोधात संताप- पूर्वसूचना न दिल्यास आंदोलनाचा इशारा नऊ नाण्यांचा गोंधळ की श्रद्धेचा घोटाळा?” “९ चे ९९! साईंच्या नावावर डुप्लिकेट नाण्यांचा बाजार?” “साईनगरीत ‘तळघर घोटाळा’ प्रकरणावर मनसेची उडी — चौकशीची जोरदार मागणी!” “साईनगरीत ‘धूम स्टाईल’ दरोडे — १५ लाखांची चैन लुटली-पोलिस मात्र झोपेतच?” रंगेल लिंगपिसाट ‘कॅप्टन खरातच्या भोंदूगिरी’चा स्फोट! फार्महाऊसवर चालायचे घाणेरडे खेळ CCTV मध्ये कैद ... खरात प्रकरणात भूकंप! ‘सिस्टम’च तपासाच्या रडारवर – अधिकाऱ्यांची गुप्त यादी तयार वनमजुराला बांधून चंदन लंपास! 02 आरोपी जेरबंद- 02 फरार – स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Blog

शिर्डी शहरात भुरट्या चोऱ्या वाढल्या! रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी!

शिर्डी (प्रतिनिधी) कोरोना व त्यानंतर आर्थिक मंदी यामुळे
शिर्डी शहरात अगोदरच बाजारपेठ व अर्थकारण अडचणीत आले असताना पोटावर शहरात मध्यवर्ती भागात आठ दहा हजार रुपये भाडे मोजणारे टपरीधारक चोरट्यांच्या रडारवर आले असून येथे भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे छोटे व्यवसायिक, टपरीवाले हतबल झाले आहे . चोरटे मात्र चोरी करुन या गोरी गरिबांना वेठीस धरत असल्याचे विदारक चित्र दिसत असुन या भोरट्या चोरट्यांना कधी जेरबंद करणार असा सवाल विचारला जात आहे.
नसलेला रोजगार, हातावर पोट, मालकाचा दोन पाचशे रुपये रोज देऊन पोटाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या पानटपरी चालकांना चोरट्यांनी आपले लक्ष केंद्रित केले असून वर्षभरात तीन वेळेला लाख दिड लाखाच्या आसपास चटका बसलेल्या व्यावसायिकाने नाव न सांगता आपली खंत व्यक्त केली आहे .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


दोन पैसे मिळवण्यासाठी संघर्ष सुरू असताना हे चोरटे दुकान फोडून महागडे सिगारेट व इतर साहित्य चोरून नेतात. चोरीची तक्रार देण्यासाठी गेले तरी तुम्ही काय विक्री करत होता .अशी चौकशी करत गुन्हा दाखल होत नसल्याने या संधींचा फायदा हे चोरटे घेत आहे. कधी दुकानाजवळ झोपायचे व रात्री आपल्या मित्रांची मदत घेऊन हजारो रुपयाचा माल लंपास करणारे जे चोरटे शिर्डी शहरात धुमाकूळ घालत आहे. अशा चोरट्यांना गजाआड करावे अशी मागणी पुढे आली आहे. परराज्यातील हे चोरटे मिळेल त्या ठिकाणी झोपणे. रात्रीच्या वेळी चोरी करणे व माफक दरात चोरीचा माल विकणे अशी या चोरट्यांचा प्रकार सुरू आहे .त्यामुळे अशाच एका चोरीच्या प्रकरणात हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झालेले दिसुन येत आहे.

kamlakar

शिर्डी शहरात छोट्या मोठ्या टपरी धारकांच्या चोऱ्या होत असल्यामुळे टपरीधारकात मोठी घबराट निर्माण झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट , यांनी या प्रकाराकडे विशेष लक्ष घालून शिर्डीत रात्रीची गस्त वाढवावी. शहरातील सीसीटीव्ही वर नजर असावी. जेणेकरून येथे भुरट्यात चोऱ्यांना आळा बसेल अशी मागणी शिर्डीतील छोटे व्यावसायिक, टपरी धारकांनी केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button