Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
Blog

संपूर्ण जगाला श्रद्धा सबुरीचा व सर्व धर्म समभावाचा संदेश देणारे श्री साईबाबा ईश्वरी अवतार होते- जगद्गुरु अरुणगिरीजी महाराज

शिर्डी( प्रतिनिधी)
संपूर्ण जगाला श्रद्धा सबुरीचा व सबका मालिक एकचा संदेश देणारे आणि सर्वधर्मसमभावाचा उपदेश करणारे शिर्डीचे साईबाबा साक्षात ईश्वरी अवतार होते. साई दर्शनासाठी देश-विदेशातून सर्व जाती-धर्माचे , पंथाचे लोक येतात . पण काही लोक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बाबांविषयी काहीतरी बोलून जातात. हे योग्य नाही. असे परखड मत अरुण गिरीजी महाराज यांनी दैनिक साई दर्शन शी बोलताना व्यक्त केले.
महान संत अरुण गिरीजी महाराज यांनी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


यावेळी अरुण गिरीजी महाराज पुढे म्हणाले की, संपूर्ण जगाला श्रद्धा सबुरी चा मूलमंत्र देणारे शिर्डीचे साईबाबा एक महान संत होते. त्यांनी संपूर्ण जगातील लोकांना मानवतेचा संदेश दिला. सर्वधर्मसमभावाचा मंत्र देऊन संपूर्ण जगातील लोकांना आपण सर्व ईश्वराची लेकरे आहोत. त्यामुळे मिल जुलकर राहण्याचा त्यांचा हा संदेश सर्वत्र शांतता ठेवण्यासाठी आजही महत्त्वाचा ठरत आहे. साईबाबांनी लोकांना धर्म, समाज म्हणून एकमेकात तेढ निर्माण करू नये. कोणतेही जात पंत धर्म हा चांगला संदेश देतो .त्यामुळे आपापसात जात धर्म पंथ असा भेदभाव करून एकमेकात भांडणे करू नये . असाच त्यांचा भाव व संदेश या त्यांच्या मूलमंत्रांतून होता. साईबाबांनी दिलेल्या मूलमंत्रांचे आचरण करत आपण जीवन चांगल्या मार्गाने जगले पाहिजे सर्वत्र शांती, प्रेम , सहानुभूती मानवता ठेवली पाहिजे.

साईबाबांनी हयात असताना पशुपक्ष्यांची, रुग्णांची सेवा केली झाडे लावून त्यांची निगा राखली. तेव्हा प्रत्येकाने पशुपक्षी यांच्यावर दया केली पाहिजे. पर्यावरण राखले पाहिजे. रुग्णसेवा केली पाहिजे. आपण सर्व ईश्वराचे लेकरे आहोत .असे समजून प्रत्येकाशी चांगले वागले पाहिजे. हाच त्यांचा खरा संदेश होता. असे जगद्गुरु अरुण गिरीजी महाराज यांनी दैनिक साईदर्शनशी बोलताना सांगितले.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button