Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
क्राईमशिर्डी

अखेर सुजय विखेंनी दिला त्या कुटुंबाला न्याय २० दिवसापासून फूस लावून पळून नेलेली मुलगी सुजय विखेंच्या प्रयत्नाने सुखरूप पोहोचली घरी

शिर्डी प्रतिनिधी काही दिवसापूर्वी शिर्डी येथील राष्ट्रवादीचे नेते निलेश कोते यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट अपडेट केली होती कि एका कुटुंबातील संजीवनी येथे शिक्षण घेत असणारी मुलीस फूस लावून पळून नेले होते ते कुटुंब आपले सर्व कामे सोडून गेल्या १८ दिवसापासून राज्यासह परराज्यात त्या मुलीचा घेत होते त्या दरम्यान त्यांना मुलीचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता त्यांना कोणाचाही आधार राहिला नव्हता म्हणून ते माजी खासदार सुजय विखे यांच्या कडे मदतीसाठी गेले असता सुजय विखेंनी तात्काळ संबंधित अधिकारी यांना फोन लावून मुलीला शोधण्यासाठी सूचना केल्याने ती मुलगी सापडली आणि तिला सुखरूप घरी आणले दिनांक १८/०६/२०२४ रोजी ती मुलगी नेहमी प्रमाणे सकाळी संजीवनी कॉलेज कोपरगांव येथे गेली आणि १२ वाजेच्या दरम्यान तिला एका मुलाने फूस लावून पळवून नेले होते आपली मुलगी आजून घरी आली नाही म्हणून कुटुंबातील सदस्यांना चिंता वाटू लागली मुलीचा शोधाशोध त्यांनी सुरु केला संजीवनी कॉलेजला जाऊन तेथील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता ती मुलगी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान कॉलेजच्या बाहेर जातांना दिसली असता कुटुंबाचे सदस्यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनला धाव घेऊन घडलेली हकीकत सांगितली असता कोपरागावच्या पोलिसांनी तात्काळ ३३६ प्रमाणे फिर्याद दाखल करून घेऊन मुलीचा शोध सुरु केला परंतु १८ दिवस झाले तरी ती मुलगी मिळत नव्हती कुटुंबातील सदस्य तिला शोधून  शोधून बेजार झाले होते त्यांना काय करावे काहीच सुचत नव्हते तेव्हा त्यांनी सुजय विखे यांना भेटायचे आणि त्यांच्याकडून मदत मागायचे हे ठरवले आणि सुजय विखेंनी सुद्धा क्षणाचा विलंब न करता तात्काळ यंत्रणा हलवल्याने ती मुलगी नागपूर येथे मिळून आली आणि सुजय विखेंच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याने त्या कुटुंबीयांनी सुजय विखे व पोलीस यंत्रणेचे आभार मानले

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button