फोटो लॉकेट वाले , गुलाब ,दूध विकणारे, साईसमाधी समवेत भक्तांचे संगणकावर बनावट फोटो तयार करणारे, एजंट व चप्पल बूट चोरांचा कायमस्वरूपी संस्थानने करावा बंदोबस्त!
शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी येथे साई संस्थांनच्या प्रवेशद्वार तीन समोर सध्या चप्पल चोरांचा सुळसुळाट झालेला आहे. त्याचप्रमाणे येथे साईबाबा समाधीचे व भक्तांचे एकत्रित असे फोटो संगणकावर बनवून विक्री करणाऱ्या फोटोग्राफर एजन्टांची संख्या वाढली आहे. तसेच हातात फोटो लॉकेट दोरे घेऊन फिरणारेही अधिक झाले असून देसाई भक्तांच्या पाठीमागे फिरून लाकडा लावतात. साई भक्तांना त्यांचा आता त्रास होऊ लागला आहे. मात्र याकडे संस्थान सुरक्षा रक्षकांचे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे फोटो लॉकेट विकणाऱ्यांचा व साई समाधी व साईभक्त असे एकत्रित फोटो संगणकावर तयार करून विकणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, चप्पल चोरांचा बंदोबस्त करावा. त्यासाठी साई संस्थांनने साई भक्तांचे हित लक्षात घेऊन त्वरित कारवाई करावी.अन्यथा त्या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा शिर्डीतील साईभक्त व मानकरी सर्जेराव अशोकराव कोते यांनी केले आहे.

सर्जेराव अशोकराव कोते यांनी प्रसिद्ध दिलेला पत्रकात म्हटले आहे की, शिर्डी हे श्री साईबाबा मूळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले असून येथे दररोज देश विदेशातून मोठ्या संख्येने साई भक्त साई दर्शनाला येत असतात. शिर्डीतील ग्रामस्थ ही साई दर्शन घेत असतात. संस्थानच्या प्रवेशद्वार तीन समोर चप्पल बूट काढून ग्रामस्थ साई दर्शनाला जात असतात. मात्र येथे चप्पल बूट चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. चप्पल बूट चोरी जात आहेत.
त्याचप्रमाणे या परिसरात व संस्थांनच्या परिसराबाहेरही गर्दीच्या ठिकाणी अनेक फोटो लॉकेट द्वारे हातात घेऊन फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे साईबाबांचे समाधी व भक्तांचे फोटो एकत्रित संगणकावर बनवून त्याची विक्री करण्यात येत आहे. असे फोटोग्राफर एजंट मोठ्या प्रमाणात साई भक्तांच्या पाठीमागे फोटो काढण्यासाठी लकडा लावतात. साई समाधी मंदिरात फोटो काढण्यास बंदी आहे. मात्र संगणकावर साई समाधी शेजारी साई भक्तांचे संगणकावर फोटो तयार करून ते साईभक्तांना विक्री केले जाते .साईभक्त असे फोटो देश-विदेशात घेऊन जातात. त्यामुळे हे फोटो साई समाधी मंदिरातले आहेत की काय ?अशी इतरांना शंका येते. त्यामुळे अशा बनावट फोटो काढणारे व एजंट यांच्यावर कडक कारवाई करावी. येथे व साई मंदिर परिसरात गर्दीच्या ठिकाणी साई संस्थानने सुरक्षारक्षक नेमले आहेत. संस्थांनने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे विशेष सुरक्षारक्षकही नेमले आहेत.
असे असताना येथे चप्पल बूट चोऱ्या होतात .फोटो लॉकेट वाले, तसेच बनवत फोटो तयार करणारे साई भक्तांना त्रास देतात. पाठीमागे लागतात. अशा घटना रोखण्यास सुरक्षारक्षकांना अपयश येत आहे. त्यामुळे या प्रकरणी साई संस्थांनचे अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती सुधाकर यार्लागड्डा, तसेच कार्यकारी अधिकारी पी शिवशंकर यांनी विशेष लक्ष घालावे. साई भक्त व ग्रामस्थांची ही मागणी म्हणून अशा प्रकारावर त्वरित कारवाई करण्यासाठी निर्णय घ्यावे. अन्यथा त्यासाठी नाविलाजाने भक्तांचे व ग्रामस्थांचे हित लक्षात घेऊन आपण साईभक्त या नात्याने आमरण उपोषण करू व त्याची जबाबदारी साई संस्थान व्यवस्थापनावर राहील. असा इशारा साई भक्त व मानकरी सर्जेराव अशोकराव कोते , शिर्डी.यांनी या पत्रकात दिला आहे.