Letest News
शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ... गुरुपौर्णिमा उत्सवाची भक्तिमय सुरुवात; समाधी मंदिरात पाद्यपूजा-श्रींची प्रतिमा-पोथी व विणाची भव्य मि... आरोपी करू नका-अटक टाळतो- पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा साकुरीतील जुगार अड्ड्यावर राहाता पोलिसांची धाड ९ जणांवर गुन्हा ४५-५० जण उपस्थित असल्याची चर्चा शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई
शिर्डी

मुंबईत घडलेल्या दुर्घटनेनंतर शिर्डीत घेतली जाईल का खबरदारी..? शिर्डीच्या मोठमोठ्या बॅनरच्या सुरक्षेची कोण घेईल जबाबदारी..?

मुंबई येथे होर्डिंग पडून निष्पाप 16 जणांचा मृत्यू झाल्यानंतर देखील नगर जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेने या प्रकाराकडे फारसे गांभीर्याने बघितले नसल्याचे दिसून येत आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


राहता तालुक्यातील शिर्डी शहरात् नगर मनमाड रोड लगत असलेले अनेक होर्डिंग शिर्डी नगरपंचायत व लगतच्या ग्रामपंचायतीच्या आशीर्वादाने व महसूल खात्याच्या परवानगी न घेता उभे असून हे धोकादायक होर्डिंग महसूल प्रशासन कधी कारवाई करणार असा प्रश्न सध्या जागरूक नागरिकांमधून व्यक्त होत आहे

kamlakar


स्थानिक ग्रामपंचायत शिर्डी नगरपंचायत व महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या दुर्लक्षामुळे शिर्डी सह नगर मनमाड रोडवर मोठ्या प्रमाणावर काहींनी होर्डिंग लावलेले आहेत होर्डिंग लावताना कुठल्या प्रकारची परवानगी न घेता काही लोकांनी आपल्या खाजगी जागेत उभे करून सहमतीने आपसात तोंडी करार करून भाडेतत्त्वावर जागा देखील उपलब्ध करून दिलेले आहेत व मोठमोठे होल्डिंग देखील उभे राहिलेले आहे

त्यातून दोन पैसे देखील उत्पन्न हे जागामालक कमवत असताना होर्डिंग धोकादायक असताना आलेल्या पावसाळा वाऱ्या वादळाचे दिवस बघता कधीही अपघात घडू शकतो अशावेळी या दुर्घटनेला कोण जबाबदार असणार आहे मोठमोठ्या कंपनीकडून लाखो रुपये घेऊन भाडे तत्त्वावर अशा पद्धतीने होर्डिंग वर जाहिराती लावल्या जातात त्यातून मोठ्या प्रमाणावर पैसा देखील कमावला जातो मात्र हे करत असताना होल्डिंगची असलेली मजबूती रस्त्यापासून असलेले अंतर त्याबरोबरच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फार काही काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते

व शासकीय नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे काहींनी तर रोड लगत असलेल्या आपल्या जागेवर व जमिनीत जाहिरातीचे होल्डिंग लावून दोन पैसे कमावण्याचा धंदा सुरू केल्याचे दिसून येते मुंबई येथे घडलेला अपघात त्यात गेलेले बळी पाहता कोपरगाव ते नगर पर्यंत अशा पद्धतीने मोठमोठे प्रमाणावर होर्डिंग लावलेले दिसून येतात अशा प्रकारच्या होल्डिंगची तपासणी या अगोदर कधी फारशी गंभीरपणे करण्यात आलेली नाही

त्यामुळे प्रशासनाचा धाक वाटत नसल्यामुळे काही लोकांनी व्यवसाय म्हणून रोडलगत होल्डिंग उभे करून आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू केल आहे या सर्व होल्डिंगचे तात्काळ सर्वेक्षण करण्याची गरज असून नियमानुसार परवानगी नसल्यास अशी परवानगी रद्द करून दंडात्मक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे अशा प्रकारच्या बेकायदा होल्डिंग वर नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व शिर्डी विभागाचे प्रांत अधिकारी त्याबरोबर तहसीलदार राहता यांनी याबाबत तात्काळ कारवाई करून भविष्यात अशा प्रकारच्या अनुचित घटना घडणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button