Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
क्राईमशिर्डी

“शिर्डी-राहात्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ- पिपाडा यांचा अप्रत्यक्ष निशाणा विखेंवर!” “राजकीय वरदहस्तामुळेच गुन्हेगारी वाढली?” — डॉ. राजेंद्र पिपाडा

अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे शिर्डी आणि राहाता परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “स्थानिक प्रभावशाली राजकीय पाठबळाशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढू शकत नाही,” असे विधान करत त्यांनी अप्रत्यक्षपणे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या राजकीय वर्तुळावर निशाणा साधल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
डॉ. पिपाडा यांनी दावा केला की, राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद अहिल्यानगर जिल्ह्यात होत असून शिर्डी-राहाता परिसरात खून, खुनाचे प्रयत्न, महिलांवरील अत्याचार, चैन स्नॅचिंग, मोटारसायकल चोरी, दरोडे, गावठी कट्टे, जुगार अड्डे, गुटखा तस्करी, वाळू-मुरूम माफिया, ड्रग्ज आणि नशेच्या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
“सामान्य नागरिक आणि साईभक्त आता सुरक्षित आहेत का?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी धार्मिक नगरी शिर्डीची प्रतिमा गुन्हेगारीमुळे डागाळत चालल्याचा आरोप केला. “भाविकांची फसवणूक, दागिने चोरी, टोळ्यांचा धुमाकूळ आणि अवैध धंद्यांचं जाळं दिवसेंदिवस वाढत आहे,” असेही त्यांनी म्हटले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनावरही गंभीर आरोप केले. “पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली,” असा आरोप करत त्यांनी पोलीस यंत्रणेतील कथित संगनमतावर प्रश्न उपस्थित केले. कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणापासून जप्त मुद्देमाल चोरीपर्यंत अनेक धक्कादायक घटनांचा उल्लेख करत त्यांनी जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा दावा केला.
दरम्यान, डॉ. पिपाडा यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून “हे आरोप फक्त राजकीय स्टंट आहेत की वास्तव?” असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे शिर्डी-राहाता हा प्रभावशाली राजकीय मतदारसंघ मानला जात असताना वाढती गुन्हेगारी हा स्थानिक नेतृत्वासाठी मोठा प्रश्न बनत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नागरिकांनी आता पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर आरोपांची दखल घेऊन ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. “साईभक्तांची नगरी गुन्हेगारांच्या ताब्यात जाऊ देणार नाही,” अशी भावना देखील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

“बुलडोझरची भाषा फक्त भाषणातच? गुन्हेगार असलेल्या दीपक पोकळेच्या घरावर का बुलडोझर चालवला नाही?

“गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर चालवणार” म्हणणारे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता परिसरात गुन्हेगारी वाढीस कारणीभूत असल्याचा आरोप होत असलेल्या दीपक पोकळे याच्यावर अद्याप का बुलडोझर चालव lले नाही? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.
“सामान्यांवर तात्काळ कारवाई होते… मग गुन्हेगार लोकांवर प्रशासन गप्प का?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत असून वाढत्या जुगार, अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रकरणांमुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button