Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
शिर्डी

शिर्डीत साईभक्तांची मंदियाळी शेकडो पालख्यासह लाखो साईभक्त रामानवमी निमित्त दाखलसंस्थानसह ग्रामस्थ सज्ज

शिर्डी :-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्‍यात आलेल्‍या विद्युत रोषणाई व फुलांच्‍या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधुन घेतले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाल्‍यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी विणा घेऊन, तर मा.जिल्‍हाधिकारी तथा सदस्‍य तदर्थ समिती ‍श्री.सिध्‍दाराम सालीमठ यांनी पोथी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानच्‍या मुख्‍य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी मंगला व-हाडे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ मा.जिल्‍हाधिकारी तथा सदस्‍य तदर्थ समिती ‍श्री.सिध्‍दाराम सालीमठ यांनी प्रथम अध्याय, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्दितीय अध्याय, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी तृतीय अध्याय, मुख्‍य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी मंगला व-हाडे यांनी चौथा अध्याय व प्रज्ञा महांडुळे/ सिनारे, प्रशासकीय अधिकारी यांनी पाचवा अध्याय वाचन करुन केला.

kamlakar


उत्सवाचे निमित्ताने मा.जिल्‍हाधिकारी तथा सदस्‍य तदर्थ समिती ‍श्री.सिध्‍दाराम सालीमठ यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. यावेळी संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके हे उपस्थित होते. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. सायं.०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा कीर्तन कार्यक्रम श्री साईबाबा मंदिराचे उत्‍तर बाजुकडील स्‍टेजवर संपन्‍न झाला. दुपारी ०२.०० ते ०३.३० वा. यावेळेत पं.ह.भ.प. देवरावजी कुळ‍मेथे महाराज, नाशिक रोड यांचा साई महिमा गुणगाण कार्यक्रम, दुपारी ०३.४५ ते ०५.३० वा. यावेळेत सौ.पद्मावती गोविंद पारेकर, निनाद ग्रुप, पुणे यांचा साईभजने व भक्‍तीगीतांचा कार्यक्रम हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर संपन्न झाला. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती झाली. सायं. रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत मिराज इव्‍हेंटस्, नवी मुंबई यांचा साई भजन संध्‍या कार्यक्रम हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर संपन्न झाला. रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. पालखी मिरवणूक परत आल्यानंतर रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती झाली. तसेच पारायाणासाठी व्दारकामाई रात्रभर उघडे ठेवण्‍यात आले.


यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने साईभक्त श्री. वेंकटा सुब्रमण्‍यम, बॅंगलोर, कर्नाटक यांच्‍या देणगीतून मंदिर व परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट तसेच मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने करण्‍यात आलेल्‍या आकर्षक विद्युत रोषणाई व ४ नंबर प्रवेशव्‍दाराचे आतील बाजुस असलेल्‍या श्रीराम प्रभूंचा भव्‍य काल्‍पनिक देखाव्‍याने साईभक्‍तांचे लक्ष वेधुन घेतले. दरवर्षीप्रमाणे मुंबई येथून आलेल्‍या श्री साई सेवक व इतर पालखी पदयात्री भाविकांनी उत्‍सवात हजेरी लावली.


उद्या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी बुधवार दिनांक १७ एप्रिल रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा श्री राम जन्‍म कीर्तन कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. यावेळेत डॉ. लता सुरेंद्र, मुंबई यांचा आयना, प्रभु रामाचा महाकाव्‍य प्रवास हा कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ०४.०० वाजता निशाणाची मिरवणुक व सायंकाळी ०५.०० वाजता श्रींचे रथाची गावातून मिरवणुक निघेल. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत श्री. विजय साखरकर, साईसेवा नृत्‍योत्‍सव, मुंबई यांचा साईस्‍वर नृत्‍योत्‍सव कार्यक्रम होणार आहे. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून, या दिवशी श्रींची शेजारती व गुरुवार १८ एप्रिल रोजीची पहाटेची श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होईल.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button