Letest News
ShirdiCrime #ShirdiPolice #GoldTheft #ShirdiNews #SDNews# पालखी मिरवणुकीतील चोरीचा तपास वेगात-चोरट्य... मातृछत्र हरपले… शिर्डीतील सौ. कमल शांताराम मिराणे यांचे दुःखद निधन साईनगरीत मान्यवरांचे आगमन- राम शिंदे आणि रामदास आठवले यांनी घेतले समाधीचे दर्शन मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच- शिर्डीत आश्रम पार्किंगमधून दुचाकी लंपास घातपाताची शक्यता नाही-पण चौकशी आवश्यक – शिर्डीत रामदास आठवले यांचे वक्तव्य आखाती युद्धाची झळ गॅस पुरवठ्यावर-गॅस कंपन्यांचा मोठा निर्णय-२१ ऐवजी ३१ दिवसांनी बुकिंग शिर्डीतील लक्ष्मीनगर अतिक्रमण हटविण्यास सुरुवात नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने सहकार्य शिर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार-आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी काय वर्णवावे साईभक्तांची भक्ती! २३ लाखांचा सुवर्ण-हिरे जडीत हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण नगरसेवक दशरथ तुपे यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार
Blog

श्रीराम मंदिराबाबत माझ्या वक्तव्याचा विपऱ्यास- मा. खासदार सदाशिव लोखंडे

शिर्डी- राम मंदिर बांधल्यामुळेच माझा पराभव झाला असे काही टिव्ही वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात आले. पंरतु राम मंदिर बांधल्यामुळे मुस्लिम मतांचे झालेले एकीकरण व अकोले तालुक्यात रावण संघटनेने राम मंदिराबाबत केलेला अप्रचार त्यामुळे अपला पराभव झाला असल्याचे आपण वक्तव्य केले होते. या वाक्याचा विपऱ्यास करण्यात आला असल्याचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले. वृत्त वाहिन्यांवर राम मंदिरामुळे पराभव झाला असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


आपण कारसेवक असून राम मंदिरासाठी जो लढा देण्यात आला त्यात आपण प्रामुख्याने सहभागी झालो होतो. सन १९९० मध्ये सोमनाथ ते आयोध्या जी रथ यात्रा काढण्यात आली होती, या यात्रेचा रथ हा चेंबुर येथे तयार करण्यात आला होता. यावेळी त्याची जबाबदारी आमचे नेते हाशु आडवानी यांच्या मार्गदर्शनाखाली मी पार पाडली होती. त्याचबरोबर संबधित रथ सोमनाथ मंदिरापर्यंत पोहचवण्याचे काम देखील दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली मी भाजपचा वार्ड अध्यक्ष म्हणून पार पाडली होती.

तसेच १९८९ साली जी शिला पुजनाचे आंदोलन झाले, देशभरातून प्रत्येक गावातून वीटा पूजन करून सर्व वीटा आयोध्या पोहचवल्या. या शिला पूजनाच्या अभियानाचा देखील मी प्रमुख होतो. १९९२ मध्ये जेव्हा बाबरी मशिद पाडली तेव्हा देखील मी त्या कारसेवेला आयोध्येत होतो. मी एकटाच गेलो नाही तर मी माझ्या वार्डातील शेकडो कारसेवक तेथे नेले होते. मी बालपणापासून संघाचा स्वंयसेवक आहेत.

हिंदुत्व माझ्या रक्तात आहे. आमचा डिनए कधीही बदलनार नाही. आम्ही आमचे आयुष्य राम मंदिरासाठी खर्च केलेले आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने सत्ता महत्त्वाची नसून राम मंदिर महत्वाचे असून लोखंडे यांनी सांगितले.


कर्जत येथे औपचारिक गप्पा सुरू असताना काही पत्रकारांनी विचारले की, राम मंदिर बांधले असतानाही तुमचा पराभव कसा काय झाला त्यावर मी रावन संघटनेचा उल्लेख केला. रावन संघटना ही हिंदू विरोधी असून ती आदिवासी समाजात हिंदुत्व व रामाबाबत अप्रचार करत असून त्याचाच फटका आपल्याला अकोले तालुक्यात बसला असल्याचेही लोखंडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्याला सहकारी सर्वच पक्षांची मदत झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मोठे सहकार्य केले असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, संपर्क प्रमुख बाजीराव दराडे, बाळासाहेब पवार, राहुल गोंदकर, अनिल पवार, चंद्रकांत गायकवाड आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button