Letest News
अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्...
क्राईमशिर्डी

बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या साई धर्मशाळा भक्तनिवास परिसरात सुरक्षा रक्षकांना एक बेवारस होंडा शाईन मोटारसायकल आढळून आली. विशेष म्हणजे, वाहनाचा आर.टी.ओ. क्रमांक तपासला असता तो बनावट असल्याचे निदर्शनास आले. मात्र, संस्थानच्या सुरक्षा विभागाने सतर्कता दाखवत इंजिन आणि चेसिस क्रमांकाच्या आधारे तपास करून मोटारसायकलच्या मूळ मालकाचा शोध लावला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


साई धर्मशाळा भक्तनिवास परिसरात बेवारस अवस्थेत आढळून आलेल्या या दुचाकीचा क्रमांक संशयास्पद वाटल्याने सुरक्षा विभागाने त्याची पडताळणी केली. तपासामध्ये वाहनावरील आर.टी.ओ. क्रमांक बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुरक्षा विभागाने पुढील तपास सुरू केला.
वाहनावरील इंजिन क्रमांक आणि चेसिस क्रमांकाच्या आधारे करण्यात आलेल्या तपासातून मोटारसायकलच्या मूळ मालकाची माहिती मिळविण्यात आली. त्यानुसार आडगाव पोलीस स्टेशन, नाशिक यांच्या माध्यमातून सदर वाहनाचे मूळ मालक गणेश प्रकाश बांदे, रा. नांदूर गाव, नाशिक यांच्याशी संपर्क साधण्यात आला.
यानंतर गणेश बांदे हे शिर्डी येथे उपस्थित झाल्यानंतर आवश्यक ती ओळख तसेच वाहनाच्या मालकीची खात्री करण्यात आली. सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित होंडा शाईन मोटारसायकल सुरक्षितपणे मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली.


सुरक्षा विभागाच्या सतर्कतेचे कौतुक
बनावट नंबर असलेल्या बेवारस वाहनाचा इंजिन आणि चेसिस क्रमांकाच्या आधारे मूळ मालकापर्यंत पोहोचत वाहन परत करण्याच्या संस्थानच्या सुरक्षा विभागाच्या कार्यवाहीचे कौतुक होत आहे.
आपली मोटारसायकल सुरक्षितपणे परत मिळाल्याबद्दल गणेश प्रकाश बांदे यांनी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेचे तसेच सुरक्षा विभागाचे आभार व्यक्त केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button