
शेतातील कृषि उत्पन्नाव्यतिरिक्त शिल्लक राहणारा काडीकचरा, पालापाचोळा यास राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा मिळावा अशी मागणी महाराष्ट्र शासन कृषि भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी डॉ.विठ्ठलदास बाळकिसन आसावा व भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी येथे केंद्रीय कृषिमंत्री ना.शिवराजसिंह चौहान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली यावेळी निखील पिपाडा,साहील पिपाडा हेही उपस्थित होते.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी केंद्रीय मंत्री शिवराजसिंहजी चौहान यांनी सहपरिवार श्री.साईनाथांचे दर्शन घेतले. डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी स्वत:च्या पेरुच्या बागेतील पेरु भेट देवुन बजरंगबलीची शॉल घालुन त्यांना सत्कार केला.
शेतातील कृषि उत्पन्नाव्यतिरिक्त शिल्लक राहणारा काडीकचरा, पालापाचोळा, ऊसाचे पाचट आदि. शेतकरी पेटवून नष्ट करतात. शेतातील अवशेष जाळल्यामुळे जिवाणू नष्ट होऊन जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाल्याने उत्पादकता घटल्याचे निदर्शनास येत आहे. पर्यावरण व जमीन या दोन्हीसाठीही हे नुकसानकारक असल्याचे अनेक संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. असे आसावा यांनी लक्षात आणून देत शासनस्तरावर शेती अवशेष जाळणाऱ्या शेतकऱ्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत आहेत त्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर शेतातील कृषि उत्पन्नाव्यतिरिक्त शिल्लक राहणारा काडीकचरा, पालापाचोळा यास राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा मिळावा अशी मागणी केंद्रीय कृषिमंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
डॉ. विठ्ठलदास बाळकिसन आसावा हे सन 1990 पासून शेतातील कुठलेही अवशेष पेटवून न देता शेतातच आच्छादन करून ‘तेरा तुझको अर्पण’ या भावनेने मातीआड करतात. यामुळे जमिनीचा पोत सुधारून उत्पादन खर्चात बचत होऊन निव्वळ उत्पन्नात वाढ झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आदर्श मॉडेल त्यांनी उभे केले आहे. डॉ. आसावा हे कृषि विभागाच्या सहाय्याने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व प्रबोधन करत असल्याबद्दल मा. केंद्रीय मंत्री महोदयांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. त्याचबरोबर आपल्या मागणीवर सकारात्मक विचार करू असे आश्वासित केले.

केंद्रीय मंत्री शिवराजसिंहजी चौहान हे मोठे साईभक्त असुन दर वर्षी ते परिवारासह नवीन वर्षानिमित्त साईबाबांचे दर्शन घेतात. गेल्या 15 वर्षापासुन चौहान कुटुंबाशी आमच्या परिवाराचे स्नेहाचे संबंध आहेत. शेतकरी असल्यामुळे आम्हाला शेतक-यांच्या व्यथा व संवेदना माहीत आहेत. केंद्रात कृषी मंत्रीपद मिळाल्याने आम्ही शेतकरी असल्यामुळे अत्यानंद झाला आहे. माझ्या स्वत:च्या पेरु बागेतील पेरु त्यांना भेट म्हणुन दिले त्यांना याचा मनस्वी आनंद झाला. राजेंद्रजी पिपाडा पेरु लाए है...असे सांगत त्यांनी त्यांच्या पत्नीला आवाज देवुन सांगितले