Letest News
72 तास उलटले… तरी गुन्हा नाही! शिर्डीत धर्मांतर प्रकरण गूढच” “हिंदुत्ववादी संघटना शांत का? शिर्डीत स... दैनिक साई दर्शनचा दणका! ‘मुंबई बिर्याणी’वर कारवाई – हॉटेल सील घरकुल मंजुरीसाठी लाच मागणाऱ्यांवर सापळा- १० हजार घेताना रंगेहात अटक! अनुयायांच्या नावावर बनावट खाती-‘समता पतसंस्था’चा महाघोटाळा उघडकीस? “समता”ला संरक्षण कोण देतंय? शिर्डीत मानपानाच्या नावाखाली नवविवाहितेचा छळ- पतीसह सहा जणांवर गुन्हा! शिर्डीत वैद्यकीय चमत्कार! 15 किलोची प्रचंड गाठ यशस्वीरीत्या काढली थकीत वीजबिलावर ५०% सवलत द्या- डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाचा धडाका- १५५ प्रकरणांत हस्तक्षेप-वर्षभरात ७ गुन्हे दाखल-अनेक विव... शेळके दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू- हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार सिन्नरचा दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर- २५ मालमत्तांची माहिती समोर!
अ.नगरक्राईम

नगरसेवक दशरथ तुपे यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार

राहता नगरपरिषदेचे नगरसेवक दशरथ अशोक तुपे यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी राहता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी राहता पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ५ मार्च २०२६ रोजी रात्री राहता शहरातील तुषार गणेश सदाफळ या व्यक्तीने नगरसेवक दशरथ तुपे यांना फोन करून शिवीगाळ करत धमकी दिली. राहता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र यात्रेनिमित्त निघालेल्या पाळण्याच्या टेंडरबाबत जाब विचारत “तू टेंडरमध्ये हस्तक्षेप का करतोस” असे म्हणत सदाफळ यांनी संतप्त भाषेत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.


धमकीवरच हा प्रकार थांबला नाही. त्यानंतर रात्री उशिरा शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुषार सदाफळ यांनी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना एकत्र जमवले. त्या जमावातून “याला जिवंत मारून टाका, याचा काटाच काढा” अशा प्रकारच्या प्रक्षोभक घोषणा देत मोठ्या प्रमाणावर आरडाओरडा करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रार अर्जात असेही म्हटले आहे की,

तुषार सदाफळ याच्याकडे बंदूक असून तो या शस्त्राचा धाक दाखवून नगरसेवक दशरथ तुपे यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे पाळण्याच्या टेंडर प्रक्रियेशी नगरसेवक तुपे यांचा कोणताही थेट संबंध नसतानाही केवळ वैयक्तिक किंवा राजकीय द्वेषातून हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या घटनेनंतर राहता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच अनेक कार्यकर्त्यांनी राहता पोलीस ठाण्यात निवेदन देत शिवाजी महाराज चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा व नगरसेवक दशरथ तुपे यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.


दरम्यान, या घटनेमुळे राहता शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून लोकप्रतिनिधींनाच उघडपणे धमक्या दिल्या जात असल्याने नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या प्रकरणात पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button