Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
शिर्डी

शिर्डीत रामनवमी उत्सव मोठया उत्साहात सुरुवात

श्री रामनवमी उत्सवानिमित्त उत्‍सवाचे प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मा.जिल्‍हाधिकारी तथा सदस्‍य तदर्थ समिती ‍सिध्‍दाराम सालीमठ यांनी पोथी, संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी विणा घेऊन तर उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व प्रशासकीय अधिकारी विठ्ठलराव बर्गे यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

यावेळी संस्थानच्‍या मुख्‍य लेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी मंगला व-हाडे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

kamlakar

श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ मा.जिल्‍हाधिकारी तथा सदस्‍य तदर्थ समिती ‍श्री.सिध्‍दाराम सालीमठ यांनी प्रथम अध्याय वाचन करून केला.

श्री रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात मा.जिल्‍हाधिकारी तथा सदस्‍य तदर्थ समिती ‍श्री.सिध्‍दाराम सालीमठ यांनी श्रींची पाद्यपूजा केली.

श्री रामनवमी उत्सवानिमित्त दानशूर साईभक्त श्री. वेंकटा सुब्रमण्‍यम, बॅंगलोर, कर्नाटक यांच्‍या देणगीतुन मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button