Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
क्राईमशिर्डी

शिर्डी पोलीस उपविभागीय सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सन 2024 मध्ये मोटरसायकल चोरीचे 241 गुन्हे!

शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी पोलीस उपविभागातील कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका, शिर्डी, राहाता व लोणी पोलीस स्टेशन हद्दीत दरवर्षी चारचाकी व दुचाकी वाहनांच्या चोरीच्या घटना घडत असतात. त्यामध्ये दिवसें दिवस दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मोटर सायकल चोरीचे गुन्हयांना आळा घालणे करीता शिर्डी उप विभागातील वरील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार मोटर सायकल चोरीचे गुन्हे घडणारे ठिकाणे निश्चीत करुन सदर ठिकाणी सी.सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले असुन

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मोटर सायकल चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध होणे करिता सक्त पेट्रोलिंग व अचानक पणे सातत्याने नाकाबंदी आयोजन करुन विना नंबरचे मोटर सायकल चालकांवर कारवाई करण्यात येऊन मोटर सायकल चोरीचे घटनांना प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच मोटर सायकल चोरीचे उघडकीस आलेल्या गुन्हयातील आरोपी यांचेकडेस सखोल व बारकाईने तपास करुन त्यांचेकडुन अशा प्रकारचे गुन्हे करणारे इतर आरोपींबाबत माहीती घेऊन त्यांचेकडुन देखील मोटर सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.


सन 2023 मध्ये मोटरसायकल चोरी गुन्हे संख्या 349 असून
सन 2024 मो.सा. चोरी गुन्हे संख्या 241 झाली आहे.
सन 2023 आक्टोंबर ते डिसेंबर मो.सा. चोरी गुन्हे संख्या 94 होती. तर सन 2024 आक्टोंबर ते डिसेंबर मो.सा. चोरी गुन्हे संख्या 40 झाली.


मोटर सायकल चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध होणे करिता शिर्डी उपविभागातील पोलीस स्टेशनला विना नंबर प्लेट चे 240 वाहनांवर कारवाई करुन 129500 रुपये दंड करण्यात आलेला आहे.


सदरची कारवाई अहिल्या नगर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, (शिर्डी उप विभाग) यांनी शिर्डी उपविभागातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांचेकडुन करून घेतली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button