Letest News
NH-160 च्या निकृष्ट कामावर पिपाडांचा हल्लाबोल!ठेकेदार सल्लागार एजन्सी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाख... शिर्डी मतदारसंघात मतदारांची धक्कादायक घट ४० हजारांहून अधिक अर्ज जमा नाहीत! सिब्बलांच्या मागणीने ठाकरेंच्या मनातील ‘धनुष्यबाण’ बाहेर? श्रीकांत शिंदेंचा शिर्डीतून घणाघात! दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता ८ हजार २०० पारायणार्थींचा सहभाग — साईनामाच्या जयघोषाने शिर्डी ... शिर्डीत हरवलेला ‘आयफोन’ साईभक्तेला परत शिर्डी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी साईचरित्र पारायणाची भक्तिमय सांगता आज सायंकाळी शिर्डीत पोथीची भव्य मिरवणूक साईचरणी कोते-गोंदकर परिवाराची श्रद्धेची लाखमोलाची ओंजळ!श्री साईचरित्र पारायण सोहळ्यासाठी दोन्ही परिव... विद्यमान खासदार नीलेश लंके यांचा माजी खासदार सुजय विखेंवर नावानिशी हल्लाबोल ‘डोनाल्ड ट्रम्पला स्वियस... साईभक्तांची लूट थांबवणार कोण? वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर नामदार विखेंच्या आदेशाची... चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी
अ.नगरक्राईम

NH-160 च्या निकृष्ट कामावर पिपाडांचा हल्लाबोल!ठेकेदार सल्लागार एजन्सी व दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

शिर्डी | प्रतिनिधी :
शिर्डी-अहिल्यानगर NH-160 महामार्गाच्या निकृष्ट कामाचा मुद्दा आता चांगलाच तापला असून, रस्त्याच्या कामाची स्वतंत्र आणि निष्पक्ष तांत्रिक चौकशी करून दोषी ठेकेदार, PMC/Consultant तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी NHAI चे प्रकल्प संचालक, अहिल्यानगर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे.
पाऊस सुरू असतानाच डांबरीकरणाचे काम, काही ठिकाणी रस्ते खचणे, मोठमोठे खड्डे, साईड गटारांची दुरवस्था, तुटलेले स्लॅब आणि डांबरीकरणाच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेले गंभीर प्रश्न यामुळे NH-160 च्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डॉ. पिपाडा यांनी तक्रारीत म्हटले आहे की, विविध ठिकाणी पाऊस सुरू असतानाही डांबरीकरण करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत काम सुरू ठेवण्याची परवानगी नेमकी कोणी दिली? कामाची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणत्या नोंदी केल्या? या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


डांबराच्या घनतेत २२ ते २५ टक्के तफावत?
विविध ठिकाणी करण्यात आलेल्या तपासणीत अपेक्षित घनतेच्या तुलनेत सुमारे २२ ते २५ टक्के कमी घनता आढळल्याचा दावा डॉ. पिपाडा यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित नमुन्यांची पुन्हा स्वतंत्र व अधिकृत प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात यावी आणि काम निकृष्ट आढळल्यास संबंधित भागाचे डांबरीकरण काढून नव्याने करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महामार्गाच्या इतर भागातही रस्ता खचणे, साईड गटारांची खराब अवस्था, तुटलेले स्लॅब आणि निकृष्ट कामाची लक्षणे आढळत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण NH-160 प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून दोष आढळलेल्या ठिकाणी संबंधित कंत्राटदाराकडून स्वखर्चाने काम करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
Road Safety Audit चीही मागणी
महामार्गाच्या आराखड्यात किंवा नियोजनात काही त्रुटी आहेत का? रस्त्याची सुरक्षितता योग्य आहे का? विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना कोणताही धोका निर्माण होतो का? याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र Road Safety Audit करण्यात यावा, अशी मागणीही डॉ. पिपाडा यांनी केली आहे.


“हा प्रश्न केवळ रस्त्याच्या गुणवत्तेचा नाही, तर नागरिकांच्या जीविताचा आणि शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा आहे. त्यामुळे कागदोपत्री चौकशी न करता अधिकारी आणि तज्ज्ञांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन स्वतंत्र तपासणी करावी,” अशी भूमिका डॉ. पिपाडा यांनी मांडली.
‘चौकशीचा फार्स नको’; संगनमताचा आरोप
कामातील अनियमितता आढळल्यास कंत्राटदार, PMC/Consultant किंवा संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून दंडात्मक कारवाई, शासनाच्या नुकसानीची वसुली आणि आवश्यक असल्यास फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच केवळ संबंधित ठेकेदाराच्या माध्यमातून किंवा त्याच्याशी संबंधित यंत्रणेकडून चौकशी करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. चौकशी प्रक्रियेत संगनमत होऊन ठेकेदाराला पूरक अहवाल तयार केला जाण्याची शक्यता असल्याचा दावा करत, संपूर्ण तपास स्वतंत्र यंत्रणेकडूनच झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.


वाराणसी IIT नको; मुंबई IIT कडून तपासणी करा!
संपूर्ण प्रकरणाची वाराणसी IIT ऐवजी मुंबई IIT तसेच अन्य स्वतंत्र शासकीय तांत्रिक संस्थेमार्फत तपासणी करण्यात यावी आणि त्याचा अहवाल जनतेसमोर सार्वजनिक करण्यात यावा, अशी ठाम मागणी डॉ. पिपाडा यांनी केली आहे.
“NH-160 हा हजारो नागरिकांच्या रोजच्या प्रवासाचा महत्त्वाचा मार्ग आहे. रस्ता निकृष्ट असेल तर त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या जीवितावर होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता दोषी आढळणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असे डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले.


चौकट : ‘दाल में कुछ तो काला है!’
ठेकेदाराच्या बाजूने काही राजकीय लोक का बोलतात? पिपाडांचा सवाल
“निकृष्ट डांबरीकरण आणि दर्जाहीन कामे करूनही काही राजकीय लोक ठेकेदाराच्या बाजूने बोलत आहेत. त्यामुळे ‘दाल में कुछ तो काला है’ हे जनतेच्या लक्षात आले आहे.”
“शिर्डी-अहिल्यानगर महामार्गाच्या कामात स्थानिक काही नेत्यांकडून अनावश्यक हस्तक्षेप होत असून, त्यांच्या हस्तक्षेपामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड केली जात असल्याची गंभीर बाब निदर्शनास येत आहे. ठेकेदाराच्या हिताची भूमिका घेतली जात असल्याने संबंधितांमध्ये संगनमत असल्याची शंका निर्माण होत आहे.


‘दाल में कुछ तो काला है’ हे तर नक्कीच आहे! त्यामुळे राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी न पडता या रस्त्याच्या कामाची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे.
ठेकेदार चौकशीचा फार्स करून चौकशी अधिकाऱ्याशी संगनमताने त्याला पूरक असा अहवाल तयार करणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. म्हणूनच वाराणसी IIT ऐवजी मुंबई IIT आणि अन्य स्वतंत्र शासकीय तांत्रिक संस्थेमार्फत तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा.
दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि शासनाचे झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करावे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड सहन केली जाणार नाही.”
— डॉ. राजेंद्र पिपाडा, भाजपा नेते

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button