Letest News
नागवाणीने लोकचंदानीला धोपटले शिर्डीत हॉटेल समोर राडा! मेव्हण्याकडून शिवीगाळ दाजीला मारहाण शिर्डीच्या मुखदर्शन हॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास! गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर साईचरणी सोन्याचा भक्तिभाव!झारखंडच्या साईभक्ताकडून २० ग्रॅम वजनाचा आकर्ष... विखेंचा ‘डाव’ जरांगेंनी उघड केला? “आम्हाला मूर्खात काढण्याचे काम सुरू” जरांगेंच्या आरोपांनी राजकीय व... दाल में कुछ काला नहीं… पूरी दाल ही काली दिख रही है! दया साई संगम डिलक्स हॉटेलच्या चोरीत कुछ तो गडबड ... वडिलांची प्रकृती गंभीर तरी १५०० भाविकांची जबाबदारी खांद्यावर! ‘मंत्रीपद सेवेचे, गुंडगिरीचे नाही!’ मंत्र्यांनी मुलाला आवर घालावा- डॉ. राजेंद्र पिपाडांचा इशारा साफसफाई करताना सापडले ६.५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण- साई कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे केले संस्थानकडे जमा!र... ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजराने दुमदुमणार शिर्डी साई समाधी मंदिरात दोन दिवस विविध कार्यक्रम रील बनवा… टॅलेंट दाखवा… अन् जिंका तब्बल ५५५५ रुपयांचे प्रथम पारितोषिक!विकास गोंदकर पा. मित्र मंडळ व ...
शिर्डी

पारायण सोहळया निमित्‍त आज श्रींच्‍या पवित्र ग्रंथाची शिर्डी शहरातून मिरवणूक काढून सांगता

शिर्डी:-
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक ०५ ऑगस्‍ट, २०२४ रोजी सुरु झालेल्‍या पारायण सोहळया निमित्‍त आज श्रींच्‍या पवित्र ग्रंथाची शिर्डी शहरातून मिरवणूक काढून सांगता झाली.
दिनांक १२ ऑगस्‍ट पर्यंत चाललेल्‍या या पारायण सोहळयामध्‍ये शिर्डी व पंचक्रोशितील सुमारे ६ हजार ५०० पारायणार्थी सहभागी झाले होते. आज सकाळी अध्याय क्रमांक ५३ (अवतरणिका) वाचन होवुन, ग्रंथ समाप्ती झाली. त्‍यानंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची पुजा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांचे हस्‍ते करणेत आली. याप्रसंगी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात, नाट्य रसिक मंचाचे पदाधिकारी आदींसह पारायणार्थी व ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते.
पारायणार्थींसाठी आज सकाळी स्‍नेहभोजनाचे आयोजन करण्‍यात आले होते. दुपारी ३.३० वाजता श्री साईसच्‍चरित पारायण समाप्‍तीच्‍या मिरवणुकीमध्‍ये पारंपारीक संबळ वाद्यांचे १०-१२ पथके, श्री देव कुडाळेश्‍वर मित्र मंडळ, कुडाळ यांचे ३ धार्मिक देखाव्‍यांचे चित्ररथ व विषेश आकर्षण रंजीनी आर्टस, मालाप्‍पुरा, केरळ यांचे पारंपारिक वाद्य व दाक्षिणात्‍य नृत्‍यासह विविध सोंगे आदींचा समावेश होता. या मिरवणूकीत पारायणार्थी व ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते. दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत श्री अरविंद महाराज, शिर्डी यांचा संगीतमय साईकथा कार्यक्रम, सायं.५.३० ते ६.३० यावेळेत डॉ. नचिकेत वर्पे, शिर्डी यांचा योग व आहार या विषयावर व्‍याख्‍यान व सायं.०७.३० ते ०९.३० यावेळेत बालकिर्तनकार ह.भ.प. कृष्‍णा हजारे, शिर्डी यांचा किर्तनाचा कार्यक्रम गेट क्र. ०३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपाच्‍या स्‍टेजवर संपन्‍न झाला. तर मिरवणूक परत आल्‍यानंतर पारायण मंडपात वीणा पूजन करणेत आले.
पारायण सोहळ्याच्‍या निमित्‍ताने आठ दिवस विविध धार्मिक, सांस्‍कृतिक, कीर्तन, प्रवचन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले होते. मंगळवार दिनांक १३ ऑगस्‍ट रोजी सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत पारायण मंडपात ह.भ.प. श्री. गंगाधर बुवा व्‍यास यांचे काल्‍याचे कीर्तन व त्‍यानंतर दुपारी १२.३० ते ०३.०० यावेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम साईआश्रम ०१ शताब्‍दी मंडप या ठिकाणी होणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button