Letest News
“९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स... शिर्डीत वारंवार वीज खंडितीविरोधात संताप- पूर्वसूचना न दिल्यास आंदोलनाचा इशारा नऊ नाण्यांचा गोंधळ की श्रद्धेचा घोटाळा?” “९ चे ९९! साईंच्या नावावर डुप्लिकेट नाण्यांचा बाजार?” “साईनगरीत ‘तळघर घोटाळा’ प्रकरणावर मनसेची उडी — चौकशीची जोरदार मागणी!” “साईनगरीत ‘धूम स्टाईल’ दरोडे — १५ लाखांची चैन लुटली-पोलिस मात्र झोपेतच?” रंगेल लिंगपिसाट ‘कॅप्टन खरातच्या भोंदूगिरी’चा स्फोट! फार्महाऊसवर चालायचे घाणेरडे खेळ CCTV मध्ये कैद ... खरात प्रकरणात भूकंप! ‘सिस्टम’च तपासाच्या रडारवर – अधिकाऱ्यांची गुप्त यादी तयार वनमजुराला बांधून चंदन लंपास! 02 आरोपी जेरबंद- 02 फरार – स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई तळघर घोटाळा? आरतीनंतर गुप्त डील- पुजाऱ्याची धमकी- पैशांचं जाळं उघड? कारवाईसाठी ग्रामस्थ एकवटले तक्रा... बसस्थानकात दुचाकी चोरीचा प्रयत्न-कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने कट उधळला
अ.नगरक्राईम

दस्तऐवजांमध्ये फेरफार उघड-कोपरगावात वतन जमिनीवर फसवणूक!-शेकडो महार कुटुंबे बेघर —

कोपरगाव तालुक्यातील महार समाजाच्या वतन जमिनीवर झालेल्या फसवणुकीमुळे शेकडो कुटुंबे बेघर झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी सकल आंबेडकरी समाजाचे तालुका अध्यक्ष प्रकाश दुशिंग यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, न्याय मिळेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


📜 दस्तऐवजांमध्ये फेरफार उघड

सर्व्हे नं. ५ ते ९ चे रूपांतर नविन सि.स.नं. १९३५ अ मध्ये

उपविभागीय अधिकारी यांच्या पत्र क्र. कावि/मिन-२२८/इ/228/७०६५९०२/२०२ दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ नुसार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. बैठकीत प्राप्त कागदपत्रांचे परीक्षण करताना मौजे कोपरगाव येथील जुने सर्व्हे क्रमांक ५, ६, ७, ८, ९ या जमिनींचे रूपांतर नविन सर्व्हे नं. १९३५ अ मध्ये झाले असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर उपअधिक्षक (भूमी अभिलेख) यांना स्थळनिरीक्षण, पंचनामा आणि चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत.


🗣️ “राजकीय नव्हे, कायदेशीर लढा” — प्रकाश दुशिंग

तक्रारदार प्रकाश दुशिंग यांनी सांगितले की, “गावातील मूळ जमिनदारांच्या हक्कांवर गदा आणत काही व्यक्तींनी कागदपत्रांमध्ये फेरफार करून जमिनी बळकावल्या. त्यामुळे अनेक मागासवर्गीय कुटुंबांची उपजीविका उद्ध्वस्त झाली आहे. आम्ही कोणतीही राजकीय बाजू न घेता, कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी लढत आहोत.”


📢 निष्पक्ष चौकशी व पुनर्वसनाची मागणी

ग्रामस्थ आणि तक्रारदारांची मागणी आहे की —

तातडीने निष्पक्ष चौकशी करण्यात यावी

ज्यांची घरे आणि जमिनी गमावल्या आहेत त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे

स्थानिक प्रशासन, भूमी अभिलेख विभाग आणि पोलीस यांनी मिळून पीडितांना संरक्षण द्यावे

तहसिल कार्यालयाने स्पष्ट केले आहे की उपअधिक्षक (भूमी अभिलेख) यांनी सूचक चौकशी, सर्व्हे नोंदींचे परीक्षण आणि तांत्रिक तपासणी सुरू केली असून, प्राप्त अहवालानुसार पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button