Letest News
राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता!
अ.नगरक्राईम

भाच्यानेच केला मामाचा खून! स्थानिक गुन्हे शाखेची 15 दिवसांच्या तपासानंतर उकल

अहिल्यानगर : शिंदा ता. कर्जत येथील हनुमंत गोरख घालमे (वय 35) यांचा आपल्या राहत्या घरात डोक्यामध्ये टणक वस्तूने मारून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना दिनांक 06/01/2026 रोजी सकाळी साडे सहा वाजता घडली होती. सदर घटनेबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (गु.र. 09/2026, कलम 103(1) भारतीय न्याय संहिता 2023) करण्यात आला होता.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तपासात उघडकीस आले सत्य
घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी सलग 15 दिवस कठोर तपास केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, मयत हनुमंत घालमे यांनी आपला भाचा तेजस रामदास अनभुले (वय 21) आणि त्याच्या कुटुंबाकडे नियमितपणे पैसे मागितले. काही पैसे न दिल्यामुळे तेजसने राग व संतापाने मयताचा खून केला, अशी कबुली आरोपीने दिली.


कारवाईत सामील पोलीस पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात सहभागी अधिकारी व अंमलदार :
पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग
पोलीस अंमलदार ऋदय घोडके, दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले, भिमराज खर्से, गणेश लबडे, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, अर्जुन बडे, चंद्रकांत कुसळकर


महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे
आरोपीस ताब्यात
सदर आरोपी तेजस अनभुले कर्जत पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून, पुढील तपास संबंधित पोलीस स्टेशन करत आहे.
ही घटना कुटुंबातील आर्थिक व वादाचे परिणाम म्हणून झालेली असून, भाच्याने मामाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button