Letest News
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ
अ.नगरशिर्डी

शिर्डी साई संस्थान नवीन विश्वस्त मंडळ स्थापन करण्याचा निर्णय या अधिवेशनात होणार मंत्री संजय शिरसाठ

महाराष्ट्र राज्याचे सामाजिकमंत्री यांनी शिर्डीत अनेक धक्कादायक खुलासे केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिर्डीत एका खासगी कार्यक्रमात त्यांनी सहपरिवार हजेरी लावली होती त्यानंतर प्रसारमध्यमाशी बोलताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले, मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेतील आरोपी कृष्णा आंधळे हा तीन महिन्यांपासून फरार असून त्याचीही हत्या झाली आहे काय असा सवाल त्यांनी उपस्थित करत एखादा आरोपी इतक्या दिवस फरार होऊन अजूनही पोलिसांना मिळून येत नाही त्यामुळे ही शंका व भीती वाटतं असल्याचं शिरसाठ यांनी सांगितलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे महायुतीत येणार यावर त्यांनी सांगितल की हे फार पूर्वीच होणार होत, कारण अजितदादा पवार, अशोक चव्हाण व इतर अनेकजण महायुतीत येणार हे भाकीत मी दोन वर्षांपूर्वीच सांगितलं होत त्यामुळे उशीरा का होईना जयंत पाटील महायुतीत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. तर शरद पावरांना धक्का देण्यासाठी हे होत नसून आता प्रत्येकाला महायुतीच्या कामावर विश्वास वाटत असून त्यामुळेच महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते मकहायुतीत येण्यासाठी इच्छुक आहेत.

उद्धव ठाकरे यांची कार्यकर्ते तसेच पक्षावरची पकड राहिली नसून कार्यकर्त्याशी संपर्क नसल्याने मोठी नाराजीची लाट उसळली असून आमचं मिशन टायगर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठं काम करत असून काही दिवसातच अनेक आमदार, खासदार, नगरसेवक हे शिंदे गटात सामील होणार आहेत त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करावे व महायुती किंवा शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करू नये असा खोचक टोलाही शिरसाठ यांनी लागवला.

तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कायदेशीर बाबींचे पूर्ण पालन केले असून ज्यावेळी न्यायालय शिक्षा सुनावेल त्याचवेळी त्यांच्यावर करावाई होईल तोपर्यंत त्यांना कुठलीही काळजी करण्याची गरज नाही.
राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात प्रसिद्ध होणार असून या लाडकी बहीण योजनेचा फार मोठा फरक या अर्थशंकल्पवार पडणार असून त्यातील त्रुटी दुरुस्त करून निर्णय होणार असून लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही

याची मी खात्री देतो असा विश्वास संजय शिरसाठ यांनी व्यक्त केला.
राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या शिर्डी साई संस्थान नवीन विश्वस्त मंडळ स्थापन करण्याचा निर्णय या अधिवेशनात होणार असून शिर्डीतील साई संस्थांनमध्ये चांगले, टिकाऊ विश्वस्त मंडळ लवकरच स्थापन होईल असंही संजय शिरसाठ यांनी सांगितलं.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button