Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
क्राईमशिर्डी

शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा गुटखा जप्त

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी पोलीस स्टेशनने गुटखा विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू करत शहरातील दोन ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून दोघांना ताब्यात घेतले असून हजारो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या आदेशानुसार शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गुटखा विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार एचसी गोमसाळे, पोलीस शिपाई विकी त्रिभुवन, पोलीस शिपाई आकाश चव्हाण आणि पोलीस शिपाई सतपाल शिंदे यांच्या पथकाने पहिली कारवाई धनतारा रोडवरील शेळके मार्केटसमोरील टपरीवर केली. येथे छापा टाकून संजय दळवी याला ताब्यात घेत हजारो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


त्यानंतर पथकाने साईबाबा कॉम्प्लेक्ससमोरील पोस्ट ऑफिसजवळ दुसरी कारवाई करत तैखान पठाण (रा. कचरा डेपो शेजारी) याच्याकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा जप्त केला.
या दोन्ही प्रकरणांत संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 274 व 275 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दैनिक साईदर्शनशी बोलताना पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “शिर्डी शहरात बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध अशीच धडक कारवाई पुढेही सुरू राहणार असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.”
गुटखा विक्रेत्यांवर झालेल्या या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, शिर्डी पोलिसांनी आता अॅक्शन मोड सुरू केल्याची चर्चा शहरभर रंगली आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button