Letest News
राहाता पोलिसांची मोठी कारवाई-साकुरीतील क्लबवर छापा- रम्मी जुगार खेळताना तिघे रंगेहात ताब्यात गर्भलिंग रॅकेटमधील अनेक संशयित फरार-पोलिसांची मोठी धरपकड मोहीम सुरू राहुरीत दरोड्याच्या तयारीत टोळी जेरबंद; एलसीबीची धडाकेबाज कारवाई! शिर्डी-राहाता कनेक्शन उघड तीन आरोप... पेट्रोल-डिझेल संपणार? अफवांनी जिल्हा पेटला प्रशासनाचा सज्जड इशारा! शिर्डीत दोन्ही शिवसेना गट आमनेसामने-शिर्डीत तणावाचे वातावरण जागेच्या बांधावरून वाद- शेकडो तरुणांचा भ... “दोन मिनिटांत दर्शन”च्या आमिषाने साईभक्तांची लूट १९०० रुपयांचा हार विक्रीप्रकरण गाजलं! प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट! प्रेयसीचा गळा चिरणाऱ्या आरोपीला जन्मठेप दसऱ्या लग्नाच्या तयारीतून पेटल... शिर्डीत पुन्हा चैन स्नॅचिंग-नूतन पोलीस अधीक्षकांनाही चोरट्यांची उघडी सलामी! कोट्यवधींचे CCTV-अनेक सु... राहत्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ! पीआय सरोदे यांच्यासमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान लक्ष्मी नगरच्या विकासकामांना गती- ड्रेनेज समस्येवर अखेर कायमस्वरूपी उपाययोजनेचा शुभारंभ
क्राईमशिर्डी

साई संस्थान च्या महाविद्यालयात डमी परिक्षार्थी पकडला!दोघांवर गुन्हा दाखल!

शिर्डी (प्रतिनिधी)

sai nirman
जाहिरात

शिर्डीत साईबाबा शैक्षणिक संकूलामधे व्दितीय वर्ष कला शाखेच्या परिक्षेचा पेपर लिहिताना डमी परिक्षार्थी पकडल्याची घटना घडली असून विद्यार्थी व डमी या दोघा विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार दि .६ मे रोजी साईबाबा संस्थान संचलीत शैक्षणिक संकूलात सावित्रीबाई फुले विद्यापिठ पुणे यांचे मार्फत इयत्ता बारावी चा पेपर सुरू होता

DN SPORTS

kamlakar

दुपारी दोन वाजता यावेळी दुसऱ्या माळ्यावरील डी- १२ या वर्गात पर्यवेक्षक परीक्षा कक्षात असताना आसन क्र . १७५९५ हा रितेश प्रकाश भोसले वय २८ रा .ओमसाईनगर शिर्डी हा या आसन क्रमांकावर परिक्षा देणे आवश्यक असताना त्या जागी भार्गव मनोहर दोडीया वय ३६ रा सावळीविहीर ता राहाता हा पेपर सोडवताना तेथे आढळून आला .

त्याचे कडे अधिक विचारणा केली असता तो उडवाउडवी ची उत्तरे देवू लागला पर्यवेक्षक यांना सदर डमी विद्यार्थी असल्याची खात्री झाल्याने त्यांनी प्राचार्य संतोष भिमराव औताडे यांना सदर प्रकारा बाबत कल्पना दिली . औताडे यांनी भार्गव दोडीया यास पकडून शिर्डी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे .


सदर तक्रारीवरून रितेश भोसले व भार्गव दोडीया याचे विरोधात ३१९ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून भार्गव दोडीया यास अटक करण्यात आली आहे . पुढील तपास पो . नि . गलांडे करत आहे .

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button