Letest News
जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाचा धडाका- १५५ प्रकरणांत हस्तक्षेप-वर्षभरात ७ गुन्हे दाखल-अनेक विव... शेळके दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू- हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार सिन्नरचा दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर- २५ मालमत्तांची माहिती समोर! शिर्डीत कथित धर्मांतर प्रकरणाने खळबळ-डि मार्ट मॉलमधील घटनेवरून वाढली चर्चा “मी नाही त्यातला!” – दीपक लोंढेची तीच जुनी पिपाणी, चौकशीत मात्र वेगळंच चित्र-लोंढेंच्या दाव्यांवर प्... शिर्डीत ‘मुंबई बिर्याणी’चा घाणेरडा खेळ उघड! बिर्याणीत गुटख्याची पुडी – खवय्यांच्या आरोग्याशी खिलवाड टपऱ्या हटवा-अन्यथा रस्त्यावर उतरू! – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा अतिक्रमणाविरोधात मनसेचा एल्गा... 🏅 शिर्डीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचा राज्यस्तरीय सन्मान 🚨 डॉ. जितेंद्र शेळके प्रकरणावरून शिर्डीत संतापाची लाट सोशल मीडियावरील आरोपांवर नागरिक आक्रमक दुर्दैवाचा दुहेरी घाव… शिर्डीचा लाडका भूमिपुत्र जितेंद्र शेळके यांच्यासह पत्नी अनुराधाताई यांचीही मृ...
Blog

22 जानेवारी ड्राय डे! मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

अयोध्येमधील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी 22 जानेवारी रोजी राज्यात ड्राय डेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री साय यांनी एका व्हिडीओ मेसेजच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. 22 जानेवारी रोजी राज्यामध्ये दारुविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मांसाची विक्रीही केली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

sai nirman
जाहिरात


“हे आपलं सौभाग्य आहे की छत्तीसगढ भगवान श्रीरामाचं आजोळ आहे. अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये श्री रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त संपूर्ण छत्तीसगढमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दिवशी संपूर्ण राज्य एखादा उत्सव असल्याप्रमाणे जल्लोष साजरा करणार आहे. घरोघरी दिवाळी असल्याप्रमाणे दीप प्रज्वलन केलं जाईल. छत्तीसगढ सरकारने 22 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यामध्ये ड्राय डे घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं साय यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.”श्री रामलल्लाच्या प्रसादासाठी त्यांचं आजोळ असलेल्या छत्तीसगढमधील शेतकऱ्यांच्यावतीने भाज्यांचा पुरवठा केला जाणार आहे. या भाज्यांची खेप अयोध्येला पाठवली जाणार आहे. यापूर्वी 30 डिसेंबर रोजी राइल मिलर्सच्या मदतीने श्री रामलल्लाला भोग दाखवण्यासाठी छत्तीसगढमधून 300 मेट्रिक टन सुंगधित तांदूळ अयोध्येला पाठवण्यात आला आहे,” अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button