Letest News
गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद”
क्राईमशिर्डी

२० लाखांची धाडसी चोरी- डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी घेतली गंभीर दखल-वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधून सखोल तपासाची मागणी

शिर्डी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सावळीविहीर बुद्रुक येथे आठ दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. बालाजी ट्रेडर्स किराणाचे मालक अमित विजयकुमार दोशी यांच्या दुकानात मध्यरात्री सुमारे २० लाख रुपयांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात ऐवजांच्या किंमती कमी लावून फिर्यादीचे गांभीर्य कमी करण्यात आले असल्याची बाब अतिशय गंभीर असल्याचे भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिका-यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून तातडीने सखोल तपासाची मागणी केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


ममता पिपाडा व डॉ. पिपाडा यांची पीडित कुटुंबाला भेट

या घटनेनंतर प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा आणि भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी दोशी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. भेटीदरम्यान दोशी यांच्या पत्नी कोमल दोशी यांनी चोरीसंबंधी सविस्तर माहिती दिली.


११ तोळे सोनं, रोख रक्कम व चांदीचे ताट चोरीस गेले

चोरट्यांनी या घटनेत रोख चार लाख २२ हजार रुपये आणि सुमारे ११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने — नेकलेस, अंगठ्या, बांगड्या, मंगळसूत्र, तसेच दोन चांदीची ताटे असा मुद्देमाल लंपास केला आहे. फिर्यादीत चोरीचा एकूण ऐवज सुमारे ७ लाख २२ हजार असा नमूद केला असला तरी बाजारभावानुसार सोन्याची किंमतच सुमारे १३ लाखांच्या आसपास आहे.


सीसीटीव्हीत चोरट्यांची स्पष्ट झलक — तात्काळ कारवाईची मागणी

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे बिल्डिंगमध्ये तब्बल आठ मिनिटे थांबले होते हे स्पष्ट झाले आहे. त्यांनी आधीच रेकी केल्याचे संकेत मिळाले आहेत. ३२ ते ३४ वयोगटातील हे दोघे चोरटे दोरीच्या साहाय्याने वरच्या मजल्यावर पोहोचले. त्यांची कार्यपद्धती अत्यंत व्यावसायिक स्वरूपाची असल्याने तातडीने त्यांना गजाआड करून मुद्देमाल हस्तगत करण्याची मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button