Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

मला कोणाचे तुपाचे,दुधाचे घोटाळे बाहेर काढायचे नाहीत किंवा करायचे नाहीत मतदार संघाच्या विकासासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात – खामकर

शिर्डी प्रतिनिधी/ महाराष्ट्राचे चर्मकार विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हरिश्चंद्र खामकर यांनी नुकतीच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बळीराजा पार्टी पक्षाकडून नुकताच खासदारकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी पक्षाचे पदाधिकारी महेंद्र धाडवे सत्यप्रकाश अर्जुने जकीर अन्सारी विनोधन मोर्या अरुण गाडेकर वकील आनंद लहामागे वकील अविनाश शेजवळ सिमोन जगताप आदीसह विविध पदाधिकारी हजर होते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

याप्रसंगी बोलताना संजय खामकर म्हणाले की शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासात आजी-माजी खासदारांना विकासाची कामे करण्यात अपयश आले असून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे विकासाचा अजेंडा नाही खासदार लोखंडे हे निळवंडेचे श्रेय घेऊन पाणीदार खासदार म्हणून मी काम केले हे सांगत आहे तर मग नामदार राधाकृष्ण विखे व माजी महसूल मंत्री थोरात यांचे निळवंडे योगदान नाही का असा सवाल विचारत खासदार वाकचौरे यांचे वय झाले तरी त्यांना सत्तेचा मोह सुटत नसल्याने आपण ही उमेदवारी करत असल्याचे संजय खामकर यांनी सांगितले

kamlakar


खामकर म्हणाले की दोन्ही खासदारांची कामगिरी निराशदायक आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे दोघांनी लोकसभेत कधी शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर प्रश्न विचारले नाही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून ते लोकांची फसवणूक करत आहेत पाणीदार खासदार हा लोखंडेचा ढोंगीपणा आहे दोन्ही खासदार कोरोना काळात कोठे होते जेव्हा लोक अडचणीत होते त्यावेळी आपण जनतेच्या बरोबर होतो

असे सांगत आपण खासदार झालो तर शेतकरी विविध प्रश्न खते औषधे शेती अवजारांना सबसिडी बेरोजगारांना रोजगार या परिसरातील लोकांसाठी कारखानदारी असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण खासदारकीच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगत जनता आता परिवर्तन करणार असल्याचे यावेळी सांगितले

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button