Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प-साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
अ.नगरराजकीय

रुग्णालय तसेच संलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे–डॉ. राजेंद्र पिपाडा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

शिर्डी (प्रतिनिधी) श्री.साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटल मध्ये विदर्भ व मराठवाड्यातुन मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत असुन आयसीयु बेड व जागा कमी पडत असल्याने शिर्डीमध्ये दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर सुसज्ज असे रुग्णालय तसेच सलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊन हॉस्पिटलचे विस्तारिकरण व्हावे. या आशयाचे निवेदन भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, शिर्डी येथील श्री. साईबाबा संस्थान रुग्णालयामद्धे उपचार घेण्याकरिता महाराष्ट्र राज्यामधील विविध भागातून विविध आजारांचे रुग्ण येत असतात. विशेष करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील रुग्ण मोठ्या प्रमाणात या रुग्णालयांत उपचार करून घेणेसाठी येत असतात, त्याच बरोबर इतर राज्यामधून श्री. साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक मोठ्या प्रमाणात शिर्डी या ठिकाणी येत असतात.


सदयस्थितीत श्री. साईबाबा संस्थान रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शिर्डी येथील श्री. साईबाबा रुग्णालयामद्धे उच्चशिक्षित डॉक्टर, प्रशिक्षित तंत्रज्ञ तसेच मुलभूत सोई-सुविधांचा आणि आधुनिक यंत्र सामुग्री व उपचार पध्दतीचा मोठा अभाव असल्यामुळे अशा रुग्णांवर आवश्यक उपचार करणे रुग्णालयांच्या आवाक्याबाहेरचे झालेले आहे,

त्यामुळे या रुग्णालयाचा मोठा विस्तार आणि विकास करून रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञान व आत्याधुनिक यंत्रसामुग्रीद्वारे उत्तम उपचार पद्धतीचा वापर करणे आवश्यक झालेले आहे. त्याचबरोबर, श्री साईबाबा रुग्णालयामद्धे कॅन्सर आणि बर्निंग सारखे नवीन विभाग सुरु करणे फार आवश्यक झालेले आहे. कारण, अशा आजारांवर योग्य उपचार करण्यासाठी या भागात किंवा जवळपास दुसरे चांगले रुग्णालय उपलब्ध नाही.


त्यामुळे, मराठवाडासारख्या दुर्गम भागातील गोर-गरीब रुग्णांना मुंबई आणि पुणे सारख्या लांब ठिकाणी महागडे उपचार करून घेणे शक्य होत नाही, परिणामी रुग्णांचे उपचाराअभावी मृत्यू होतात. असे दिसून येत आहे. श्री.साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर डॉक्टरांअभावी बंद आहे. एमआरआय, सीटीस्कॅन करिता तीन-तीन महिन्याच्या तारखा दिल्या जातात. अपघात किंवा ह्रदयविकाराचा झटका अशा तातडीच्या रुग्णांकडे कॅज्युल्टीत लक्ष दिले जात नाही.

तसेच बेड उपलब्ध नसल्याचे कारणे सांगून पेशंट बाहेर पाठवले जातात. शिर्डी संस्थानचे सुपर हॉस्पीटल नव्हे तर रेफर हॉस्पीटल झाले आहे असे वाटु लागले आहे.


वरील अडचणी लक्षात घेवून आपण आपल्या स्तरावरून शिर्डीमध्ये दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर सुसज्ज असे रुग्णालय तसेच सल्लग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊन शिर्डी संस्थानच्या रुग्णालायचा विस्तार आणि विकास करण्यासाठी आवश्यक उपाय-योजना करण्यात याव्यात. असे या निवेदनात म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button