Letest News
शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ... गुरुपौर्णिमा उत्सवाची भक्तिमय सुरुवात; समाधी मंदिरात पाद्यपूजा-श्रींची प्रतिमा-पोथी व विणाची भव्य मि... आरोपी करू नका-अटक टाळतो- पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा साकुरीतील जुगार अड्ड्यावर राहाता पोलिसांची धाड ९ जणांवर गुन्हा ४५-५० जण उपस्थित असल्याची चर्चा शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई
अ.नगरक्राईम

“डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे

राहाता तालुक्यात उघडकीस आलेल्या गर्भलिंग तपासणी प्रकरणाने आता अत्यंत भीषण वळण घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. पिंपरी निर्मळ येथील कारवाईनंतर समोर आलेले धागेदोरे, श्रीरामपूर कनेक्शन, संशयित एजंटांची हालचाल आणि वाढत चाललेली चौकशी पाहता हे केवळ एक ‘क्लिनिक प्रकरण’ नसून संपूर्ण तालुक्यात पसरलेल्या संघटित साखळीचे जाळे असल्याचा संशय अधिक गडद होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या कथित रॅकेटमध्ये गर्भलिंग तपासणीपासून गर्भपातापर्यंतची संपूर्ण ‘सिस्टम’ कार्यरत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. काही ठिकाणी अविवाहित जोडपी, सामाजिक दबावाखालील महिला आणि आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांचा गैरफायदा घेत लाखोंची काळी कमाई करण्यात आल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


साकुरी-सावळीविहीरपर्यंत संशयित जाळे; अनेकांचे धाबे दणाणले 🔥
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचे धागेदोरे आता राहाता शहरापुरते मर्यादित नसून साकुरी, सावळीविहीर आणि आसपासच्या भागांपर्यंत पोहोचल्याचे समोर येत आहे. काही संशयित मध्यस्थ, खासगी संपर्क आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्ती तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, काही व्यवहार पूर्णपणे ‘ऑफ द रेकॉर्ड’ पद्धतीने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मोबाईल कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार, औषध पुरवठा आणि संशयित भेटींची माहिती तपासली जात असल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणल्याचे बोलले जात आहे.गुप्त औषध पुरवठा’ आणि बेकायदा गर्भपात? तपासात धक्कादायक माहितीची चर्चा ⚠️
या प्रकरणात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा अनधिकृत वापर झाल्याचीही गंभीर चर्चा सुरू आहे. काही व्यवहार नोंदीविना आणि रोख स्वरूपात पार पडल्याचा संशय असून, तपास यंत्रणा आता औषध पुरवठादार, एजंट आणि संबंधित संपर्कांची माहिती गोळा करत असल्याचे समजते.


काही ठिकाणी ‘कोडवर्ड सिस्टम’ वापरून संपर्क साधले जात असल्याची माहितीही समोर येत असून, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे धक्कादायक तपशील बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष 👀या संपूर्ण प्रकरणात आता अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे पुढे कोणती मोठी कारवाई करतात, कोणत्या संशयितांवर गुन्हे दाखल होतात आणि आणखी किती नावे समोर येतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार नसला तरी, राहाता तालुक्यात उघड झालेल्या या कथित गर्भलिंग रॅकेटमुळे वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण प्रशासन हादरल्याची भावना व्यक्त होत आहे.

कडक कायदे असूनही बेकायदा प्रकार सुरूच; संतापाची लाट
गर्भलिंग तपासणी आणि बेकायदा गर्भपात रोखण्यासाठी शासनाने कठोर कायदे लागू केले असतानाही काही संशयितांकडून नियमांना केराची टोपली दाखवल्याचे चित्र समोर येत आहे. अशा अमानुष प्रकारांमुळे समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
“अशा प्रकरणांतील दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशा बेकायदा कृत्याचे धाडस करणार नाही,” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button