Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
राजकीयशिर्डी

श्री साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीच्या २०२६ दिनदर्शिकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन

शिर्डी | प्रतिनिधी (तुषार महाजन)
श्री साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर २०२६ या वर्षाची दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या शुभहस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सत्तेत आल्यापासून नवनवीन संकल्पना राबवत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले असून त्याचाच एक भाग म्हणून ही आकर्षक व उपयुक्त दिनदर्शिका सादर करण्यात आली आहे.

श्री साई संस्थानच्या झीरो नंबर हॉल येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, साई भक्त व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या दिनदर्शिकेत श्री साईबाबांचे वर्षभरातील उत्सव, धार्मिक कार्यक्रमांचा सविस्तर आढावा देण्यात आला असून येत्या १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ऐतिहासिक श्री साई परिक्रमा महोत्सवाचाही विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

DN SPORTS

प्रत्येक पानावर श्री साईबाबांचे भावस्पर्शी छायाचित्र, तसेच ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ व पर्यावरण संवर्धनाचे संदेश देत सामाजिक भान जपणारी ही दिनदर्शिका अत्यंत सुंदर व प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. यावेळी त्यांनी श्री साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हा. चेअरमन पोपट कोते व संपूर्ण संचालक मंडळाच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

याप्रसंगी चेअरमन विठ्ठल पवार, व्हा. चेअरमन पोपटराव कोते, संचालक मंडळ सदस्य महादु कांदळकर, कृष्णा आरणे, भाऊसाहेब कोकाटे, संभाजी तुरकणे, देविदास जगताप, विनोद कोते, मिलींद दुनबळे, तुळशिराम पवार, रविंद्र गायकवाड, भाऊसाहेब लवांडे, इकबाल तांबोळी, सौ. सुनंदा जगताप, सौ. लता बारसे, रंभाजी गागरे, भाऊसाहेब लबडे (तज्ज्ञ संचालक), विलास वाणी (सचिव), बाबासाहेब अनर्थे (सह सचिव) व संभाजी कोते (सहा. सह. सचिव) आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button