Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
शिर्डी

विखरणी ते पंढरपूर दिंडी यात्रेचे  चे शिर्डीत स्वागत 

सावळीविहीर (वार्ताहर) नाशिक जिल्ह्यातील विखरणी येथील पंढरपुर येथे वारी साठी निघालेल्या सुमारे दोनशे विठ्ठल भक्तांच्या दिंडी चे साईबाबा चे पवित्र भूमीत नुकतेच स्वागत करण्यात आले. 

sai nirman
जाहिरात

    नाशिक जिल्ह्यातील विखरणी  येथील ना.छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक व लक्ष्मी ग्रामीण सहकारी पतसंस्था विखरणी चे  अध्यक्ष   मोहनराव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली सदर दिंडी चे आयोजन करण्यात आले होते.काल सुमारे दोनशे वारकऱ्यांचे शिर्डी जवळील निघोज येथील साई पालखी निवारा येथे आगमन झाले. तेथे पत्रकार अशोक दुशिंग व साई पालखी निवारा चे व्यवस्थापक स्वप्निल शिंदे, रिपाई चे माजी जिल्हाध्यक्ष चांगदेव जगताप,  सुपरवायझर सागर खरात, चंद्रकांत जगताप, लक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक कृष्णा कोळगे आदींनी त्यांचे स्वागत करत श्री. शेलार यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.  यावेळी  दिंडी तील सर्व वारकरी यांना चहापानाची व्यवस्था यावेळी करण्यात आली.

DN SPORTS

kamlakar

   यावेळी मोहनराव शेलार म्हणाले की,आम्ही नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना घेउन  विवीध धार्मिक स्थळांना भेट देत परमार्थ साधत  असतो. आज माऊली पंढरी चे भेटीचा योग आला माझे सोबत एवढ्या मोठ्या प्रमाणात माउली भक्तांना घेऊन जाण्याचा योग आला यामुळे मी धन्य समजत आहे. यापुढे ही समाजाची सेवा करण्याची साईबाबा व पांडुरंग आम्हाला शक्ती देवो अशी मनोकामना व्यक्त करत शिर्डीत आमचे स्वागत झाले यामुळे मी व माझे सहकारी भारावून गेल्याची भावना यावेळी त्यांनी  व्यक्त केली. 

   याप्रसंगी लक्ष्मी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रमुख सौ.ज्योतीताई शेलार,दिपक गुमरे,पतसंस्थेचे व्यवस्थापक कृष्णा कोळगे, कोऱ्हाळे अंगणवाडी च्या मदतनीस वर्षाताई कोळगे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button