Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरक्राईम

जुन्या वाहताना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ बसविण्याचा शासन निर्णय!

श्रीरामपूर( प्रतिनिधी) वाहनांच्या नंबर प्लेट मध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे आणि रस्त्यावर धावणाऱ्या वाहनाची ओळख पटविण्याकरिता १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी) बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनांना नंबर प्लेट बसविणे करीता सेवा पुरवठादार एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स या संस्थेची यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. htttp://maharashtrahsrp.com या संकेतस्थळावर जाऊन वाहन क्रमांकाची ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ नोंदणी करणे आवश्यक आहे.

कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, राहाता, कोपरगांव, संगमनेर, अकोले या तालुक्यांकरीता सेवापुरवठादार यांच्याकडून श्रीरामपूर येथील मुळे मोटर्स, बेलापुर रोड श्रीरामपूर, राहुल ट्रॅक्टर्स श्रीरामपूर, शिरोडे ऑटोमोबाईल्स प्रा. लि. श्रीरामपूर हे अधिकृत फिटमेंटर सेंटर नियुक्त करण्यात आलेले आहेत.


हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दुचाकी वाहन व ट्रॅक्टर्ससाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये आणि चारचाकी, प्रवासी चारचाकी, ट्रक, ट्रेलर्स व इतर वाहनांसाठी ७४५ रुपये इतका दर निश्चित करण्यात आलेला आहे. सर्व वाहनधारकांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे जुन्या नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन श्रीरामपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत जोशी यांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button