Letest News
दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव!
राजकीयशिर्डी

साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी मिसाल

शिर्डी | प्रतिनिधी
सोन्याचा मोह नाही, कर्तव्याची जाणीव मोठी! श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागातील कर्मचारी श्री. भाऊसाहेब लहानू दिघे यांनी आपल्या प्रामाणिकपणातून संस्थानच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संस्कारांची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
श्री साईबाबा संस्थानच्या समाधी मंदिरात कर्तव्य बजावत असताना सुरक्षा कर्मचारी श्री. भाऊसाहेब दिघे यांना एक सोन्याची अंगठी आढळून आली. सदर अंगठीचे वजन ३.९६० ग्रॅम असून तिची अंदाजे किंमत ५० हजार रुपये आहे.
मात्र, हातात आलेल्या सोन्याच्या अंगठीचा कोणताही मोह न बाळगता श्री. दिघे यांनी ती तत्काळ संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केली. त्यांच्या या कृतीतून कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि साईसेवेची भावना दिसून आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची परंपरा कायम
श्री साईबाबांच्या पावन भूमीत सेवा करण्याचे भाग्य लाभलेल्या संस्थानच्या कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी अशा प्रामाणिकपणाचे दर्शन घडते. भाविकांच्या हरवलेल्या मौल्यवान वस्तू स्वतःकडे न ठेवता त्या संस्थानच्या कार्यालयात जमा करण्याची ही भावना निश्चितच कौतुकास्पद आहे.
‘साईंच्या दरबारात सेवा म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर एक जबाबदारी आणि श्रद्धेची सेवा आहे,’ याचीच जणू प्रचिती श्री. दिघे यांच्या कृतीतून आली आहे.


श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडीलकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. भीमराज दराडे यांनी श्री. भाऊसाहेब दिघे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
सोन्याची किंमत ५० हजार रुपये असली, तरी त्यापेक्षा मोठी किंमत श्री. दिघे यांच्या प्रामाणिकपणाची आहे, अशी भावना या घटनेनंतर व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button