Letest News
शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल शिर्डीतील रिक्षा लूट प्रकरणाने उघडे पाडले गंभीर प्रश्न! शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका!
Blog

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिशिंगणापूर येथे प्रत्यक्ष येऊन प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला.

देशभरातील श्रद्धास्थान असलेल्या जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानच्या प्रशासनात मोठा बदल झाला आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज शनिवारी, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शनिशिंगणापूर येथे प्रत्यक्ष येऊन प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यावेळी नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे, तसेच भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. देवस्थानाच्या अतिथीगृहात आमदार लंघे यांनी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे स्वागत केले.
राज्य सरकारने दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या आदेशानुसार, शनिशिंगणापूर देवस्थानचा विश्वस्त मंडळ बरखास्त करत, २०१८ चा देवस्थान व्यवस्थापन कायदा लागू केला असून,

त्याअंतर्गत तात्पुरता प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच नव्या विश्वस्त मंडळाची नेमणूक केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पदभार स्वीकाऱ्यापूर्वी डॉ. पंकज आशिया यांनी उदासी महाराज मठात अभिषेक केला आणि शनी चौथर्‍यावर जाऊन शनीदेवाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी भाविकांच्या श्रद्धेला योग्य न्याय देण्यासाठी पारदर्शक व भक्ताभिमुख प्रशासन उभारण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले, “देवस्थान प्रशासनाने भाविकांच्या सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शासन लवकरच नवीन विश्वस्त मंडळाची स्थापना करणार असून, त्यात स्वतंत्र अधिकारी नेमण्याची कार्यवाही देखील केली जाईल. प्रशासन भाविकाभिमुख राहील याची खात्री दिली जाईल.”यावेळी आ.लंघे पुढे म्हणाले देवस्थानचा मागील कारभार जो झाला तो सोडून पुढे स्वच्छ कारभार कसा होईल याकडे लक्ष दयावे.

यावेळी त्यांनी नेवासा तालुक्यातील जनतेच्या वतीने प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिशिंगणापूर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात आले. त्यांनी अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने आपण सत्कार स्वीकारणार नाही असे सांगत शनिशिंगणापूर देवस्थानच्या कारभार अतिशय चोख पार केला जाईल असे सांगितले. मागील गैरकारभार आरोपा बाबत बोलताना ते म्हणाले येथून पुढे देवस्थानच्या कारभारात भाविकांचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम केले

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button