Letest News
गॅस टंचाईची चाहूल-शिर्डी साई प्रसादालयावर परिणामाची शक्यता गॅसचा वापर काटकसरीने करा-अफवांवर विश्वास ठेवू नका – बबनराव भुसारी ShirdiNews #RickshawIssue#शिर्डीत मीटरविना रिक्षांचा हैदोस-साईभक्तांची सर्रास लूट – प्रशासन झोपेत का... Shirdi #SaiBaba #TatyaKotePatil #SaiBhakt #ShirdiNews #SaiDevoteesसाईबाबा के परम भक्त स्व. तात्याजी ... #Shirdi #Saibaba #TatyaKotePatil #साईबाबांचे जिवलग भक्त कै. तात्याजी गणपतराव कोते पाटील यांची ८१ वी ... #StopFemaleFoeticide#भ्रूणहत्या रोखण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा सरसावले #GrowmoreScam#जेलची हवा लागताच ‘ग्रोमोर’चा ठगसेन भूपेंद्र सावळे गयावया करू लागला “मला बाहेर काढा… सर... ShirdiCrime #ShirdiPolice #GoldTheft #ShirdiNews #SDNews# पालखी मिरवणुकीतील चोरीचा तपास वेगात-चोरट्य... मातृछत्र हरपले… शिर्डीतील सौ. कमल शांताराम मिराणे यांचे दुःखद निधन साईनगरीत मान्यवरांचे आगमन- राम शिंदे आणि रामदास आठवले यांनी घेतले समाधीचे दर्शन
क्राईमशिर्डी

रिक्षावाला दुशिंग म्हणे मी आहे पत्रकार शेवटी मला कोण कसं हो धरणार ? पोलिसाची कॉलर धरत दुशिंग म्हणे माझं कोण काय वाकडं करणार ?

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डीत श्री साईबाबा समाधी मंदिर गेट एक समोर नगर मनमाड रस्त्यावर मध्यभागी ॲपे रिक्षा उभी असताना पोलिसांनी त्यास रस्त्यात गाडी का उभी केली असे विचारताच पोलिसांना शिवीगाळ केल्यामुळे या ॲपे रिक्षा चालकाविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुरेश कारभारी गोलवड यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,

दिनांक 26/04/2025 रोजी सकाळी 08/45 वा चे सुमारास मी, तसेच पोनि गलांडे सो, पोहेकों काळोखे, पोकों घुले असे शिर्डी शहरात सरकारी जिप नंबर MH 16 N 544 हीचेमधुन अहिल्यानगर ते मनमाड जाणारे रोडवर पेट्रोलींग करीत होतो.

पेट्रोलींग दरम्यान आम्ही श्री. साईबाबा समाधी मंदीर गेट नंबर 1 समोर आलो असता तेथे रोडवर अँपे रिक्षा नंबर MH 16 AJ 8792 ही रस्त्यावर मध्यभागी उभी होती व त्यातुन प्रवासी खाली उतरत होते. तेव्हा मी सदर अँपे रिक्षा चालकाला म्हणालो की, तु रस्त्यात तुझी अॅपे रिक्षा उभी करुन प्रवाशांना का खाली उतरवतो,

तु रस्त्याचे कडेला रिक्षा का उभी केली नाही, असे म्हणालो असता तो मला अरेरावीची भाषा करु लागला. त्याने आम्हाला त्याचे खिशातुन प्रेस रिपोर्टर नावाचे असलेले त्याचे ओळखपत्र आम्हाला दाखवून बोलला की, मी प्रेस रिपोर्टर आहे, तुम्ही माझे काही करु शकत नाही, तेव्हा आम्ही त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मनोज रंभाजी दुशिंग वय 50 वर्षे रा. पानमळा, शिर्डी ता राहाता जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.

त्यावेळी मी व पोलीस निरीक्षक गलांडे सो त्याला समजावुन सांगत असताना त्याने मला शिवीगाळ करुन माझ्या अंगावर धावून आला व माझे सरकारी गणवेशाची कॉलर पकडुन तुम्ही जर माझ्या नादाला लागले तर, मी कोण आहे, तुम्हाला दाखवतोच असे म्हणुन मी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे.

अशा आशयाची फिर्याद शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात या रिक्षा चालका विरोधात म्हणुन भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 132,352,351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button