Letest News
कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न... घरकुलाच्या अनुदानासाठी २० हजारांची लाच-ग्रामविकास अधिकारीसह तिघांवर एसीबीचा सापळा प्रेम-पैसे आणि 'खंडणी'चा गुंता-आता सत्य बाहेर काढणार तपास! शिर्डीत योगेश तिया प्रकरणाची जोरदार चर्चा मतदारांनो सावधान! SIR-2026 अंतर्गत घरभेटीला सहकार्य करा-नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात यांचे आवाहन शिर्डीत नाही-थेट मुंबईत धाव…! योगेश तिया यांच्या फिर्यादीभोवती संशयाचे धुके-खंडणीचा गुन्हा आधी की बल... वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण
अ.नगरक्राईम

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणाने राहता हादरले संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक

राहता (प्रतिनिधी) : राहता शहरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला धमकी दिल्याच्या गंभीर घटनेमुळे शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुख्य आरोपी हरिदास गायकवाड याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून २०२६ रोजी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधी, पीडितेचे नातेवाईक आणि नागरिकांनी राहता पोलीस ठाण्यावर जाऊन पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले. या प्रकरणाचा सखोल, निष्पक्ष आणि वेगवान तपास करून दोषी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
नागरिकांनी या प्रकरणातील सर्व पैलूंची बारकाईने चौकशी करण्याची आवश्यकता व्यक्त केली असून पीडित कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली आहे. तपासादरम्यान कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा हस्तक्षेप होऊ नये, तसेच पीडितेला न्याय मिळावा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
अल्पवयीन मुलीशी संबंधित या गंभीर घटनेमुळे राहता शहरात खळबळ उडाली असून संपूर्ण परिसराचे लक्ष आता पोलीस तपास आणि पुढील कारवाईकडे लागले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button