Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरक्राईम

लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश!

राहाता प्रतिनिधी : लग्नाच्या मांडवात जुळलेले नाते अवघ्या काही दिवसांत फसवणुकीच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक घटना राहाता तालुक्यात उघडकीस आली आहे. एकरूख (ता. राहाता) येथील युवकाच्या संसाराची स्वप्ने उद्ध्वस्त होण्यापूर्वीच राहाता पोलिसांनी वेळीच कारवाई करत आंतरजिल्हा बनावट विवाह रॅकेटचा पर्दाफाश केला. विशेष म्हणजे, या संपूर्ण कटाची माहिती स्वतः नवरीनेच दिल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने विवाहाच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला. राहाता शहर परिसरात उघडकीस आलेली ही सलग तिसरी घटना असून, यामुळे बनावट विवाह रॅकेटचे राज्यभर पसरलेले जाळे समोर आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तपासात छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या टोळीचे धागेदोरे उलगडले आहेत. या प्रकरणात एजंट अमोल ज्ञानदेव पिंजारी (रा. गोंडेगाव, ता. श्रीरामपूर), संगीता शिंदे (रा. आळेफाटा, ता. जुन्नर), सोनाली मोहन भोसले (रा. वाटूर फाटा, ता. परतूर) आणि नवरी राधा रमेश काळे (रा. देवमूर्ती, जि. जालना) यांच्याविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी एकरूख येथील युवकाकडून तब्बल १ लाख ६० हजार रुपये घेत आळेफाटा येथे विवाह लावून दिला. त्यानंतर नवरी काही दिवस एकरूख येथे पतीच्या घरी वास्तव्यास होती. पुढे कुटुंबाच्या रितीरिवाजानुसार कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिरात पुन्हा विवाह विधीही पार पडले.


मात्र, काही दिवसांनंतर घरासमोर काळ्या काचा असलेली पांढऱ्या रंगाची चारचाकी येताच संशय निर्माण झाला. नवरी राधा काळे त्या वाहनाकडे जात असल्याचे पाहून कुटुंबीयांनी तिला विचारणा केली. त्याचवेळी संबंधित कार भरधाव वेगाने निघून गेली. यानंतर नवरीने संपूर्ण कटाची कबुली देत बनावट विवाह रॅकेटचा पर्दाफाश केला.
गुन्हा आळेफाटा पोलिसांकडे वर्ग
मुलगा एकरूख येथील, मुलगी जालना जिल्ह्यातील आणि विवाह पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे एजंटमार्फत झाल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी आळेफाटा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले एजंट अमोल पिंजारी आणि राधा रमेश काळे यांना पुढील तपासासाठी आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

लग्नाच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने विवाह जुळविताना संबंधित व्यक्ती, एजंट आणि कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button