Letest News
रस्ता अडवल्याच्या कारणावरून रक्तरंजित हल्ला-बीअरच्या बाटल्यांनी दोघांना केले रक्तबंबाळ ३० दारू धंदे अभयात एकावरच कारवाई-मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई! मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई
क्राईमशिर्डी

नगर परिषदेने संबंधित हॉटेलचे अनधिकृत केलेले अतिक्रमण येत्या ८ दिवसात न काढल्यास आमरण उपोषण जितेश लोकचंदानी 

शिर्डी( प्रतिनिधी)
शिर्डी मध्ये नगरपरिषद हद्दीतील पिंपळवाडी रोड येथील लक्ष्मी मंदिरासमोरील हॉटेल साईस्पर्श व हॉटेल मिनी पंजाब मध्ये  अनधिकृत बांधकाम झालेले असताना व अनेकदा तक्रार करूनही  ते पाडण्यात येत नसल्यामुळे हे अतिक्रमित बांधकाम त्वरित पाडावे. अन्यथा उपोषण करून न्यायालयात दाद मागणार अशी मागणी करणारा अर्ज संबंधित अधिकारी यांच्याकडे जितेश लोकचंदांनी यांनी केला आहे .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


जितेश लोकचंदांनी यांनी या निवेदनात म्हटले आहे की,
 शिर्डी नगर परिषद हद्दीतील पिंपळवाडी रोड, लक्ष्मी मंदिर समोरील हॉटेल साईस्पर्शचे  मालक लोकचंदानी यांनी त्यांच्या हॉटेल साईस्पर्श व हॉटेल मिनी पंजाब मध्ये अनाधिकृत अतिक्रमण केलेले आहे ‌.त्याची मी सन 2019 साली हे अनधिकृत अतिक्रमण पाडण्यासाठी नगर परिषद व संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती .

परंतु माझ्या तक्रारीवर कोणीही दखल घेतली नव्हती‌ म्हणून मी दिनांक 18/01/2025 रोजी पुन्हा ते अतिक्रमण काढणे बाबत अर्ज केला आहे. वारंवार शिर्डी नगर परिषदेकडे या संदर्भात आपण पत्रे पाठवली आहेत. तक्रार केली आहे. पण शिर्डी नगरपरिषद त्याकडे दुर्लक्ष करीत एकीकडे शिर्डीतील गोरगरिबांच्या झोपड्या टपऱ्या अतिक्रमण काढण्यात येत आहे. पण दुसरीकडे श्रीमंतांची अतिक्रमणे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

तेव्हा शिर्डीतील या हॉटेलचे अतिक्रमण पाडण्यात यावे. आठ दिवसांत शिर्डी नगर परिषदेने हे अतिक्रमण काढले नाहीतर मी  कुठलीही  पर्व सूचना न देता आमरण उपोषण करणार आहे ,शिर्डी शहरातील हॉटेल साई स्पर्श व  हॉटेल मिनी पंजाब मधील अतिक्रमण काढण्यात यावे. पालकमंत्र्यांनी याकडे विशेष लक्ष घालावे.अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button