Letest News
रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे तोडू नयेत-सातबारा देण्याची मागणी शिर्डीत हरवलेले मोबाईल शोधून देण्यात पोलिसांचे कौतुकास्पद काम
शिर्डी

श्री.साईबाबा संस्‍थानच्‍या रुग्‍णालयात श्री.साईनाथ रुग्‍णालय येथे कॅन्‍सर स्क्रीनिंग टेस्ट शिबीर संपन्‍न…

दि.२२ जुन २०२४  ते  दि.२४ जुन २०२४ रोजी स.०९.०० वा. श्री साईबाबा  संस्‍थानचे वतीने श्री साईनाथ रुग्‍णालय येथे श्री साईबाबा संस्‍थान कर्मचारी यांचेकरीता  तोडांच्‍या व घशाच्‍या कर्करोग कर्करोग (Head and Neck) तसेच महिला कर्मचारी यांचेकरीता Breast Cancer Screening test या शिबीराचे आयोजन करणेत आलेले होते. या शिबीराकरीता लुपीन कंपनीने मोफत Screening test चे मशिन उपलब्ध करुन दिले होते. सदर Screening test शिबीराकरीता ०३ दिवसात  सुमारे ४१८ कर्मचारी यांनी  नोंदणी केली होती  त्‍यापैकी ३१८ कर्मचारी यांनी  प्रत्‍यक्ष सहभाग नोंदवला.

सदर शिबीराचे उद्घाटन श्री. साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, गोरक्ष गाडीलकर यांचे हस्‍ते करणेत आले. या प्रसंगी बोलताना श्री गाडीलकर म्‍हणाले की, श्री साईबाबा संस्‍थानमधील सर्वच कर्मचारी यांची टप्‍प्‍याटप्‍प्‍याने Cancer Screening test करणेत येणार आहे. कर्मचारी बांधवानी सदरील तपासणी शिबीराचा घाबरुन न जाता Cancer Screening test करावी या तपासणीमधुन निदान झालेल्‍या कर्मचा-याला कॅन्‍सरशी लढताना संस्‍थान पुर्णपणे पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. तरी संस्‍थान मधील कर्मचारी यांनी आपल्‍या आरोग्‍याची नियमीतपणे काळजी द्यावी कर्मचा-यांकरीता असेच तपासणी शिबीरे यापुढेही केली जातील.
या प्रसंगी उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.मैथिली पितांबरे, कॅन्‍सर तज्ञ डॉ.मुकुल घारोटे, लुपीन कंपनीचे पंकज घुगे राहुल गुप्‍ता,अपर्णा (जीनवाल) जाधव. डॉ.संपदा दाभाडे, प्र.अधिसेविका नजमा सय्यद, कार्यालय अधिक्षक प्रमोद गोरक्ष यांचा सह रुग्‍णालयातील सर्व कर्मचारी, रुग्‍ण व रुग्‍णांचे नातेवाईक उपस्‍थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्‍तावीक डॉ.मैथिली पितांबरे यांनी केले, सुत्रसंचालन सुरेश टोलमारे,जनसंपर्क अधिकारी यांनी केले तर मान्‍यवरांचे आभार डॉ.प्रितम वडगावे प्र.वैद्यकीय संचालक यांनी मांडले .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button