Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
अ.नगरक्राईम

मकोका कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक विधानसभेत सादर

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका) कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक विधानसभेत सादर केले आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक सभागृहात सविस्तरपणे मांडले आणि त्यामागची भूमिका स्पष्ट केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

ही केवळ कायद्यातील तांत्रिक सुधारणा नसून, समाजाच्या रक्षणाची आमची जबाबदारी आहे. तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडू नये, यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. ही सुधारणा अमली पदार्थांच्या तस्करीसाठी जबाबदार असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाईसाठी मार्ग मोकळा करणार आहे.

मकोका कायद्यातील सुधारणा अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांना ‘संघटित गुन्हेगारी’ म्हणून परिभाषित करेल. यामुळे NDPS कायद्यातील प्रकरणांवर आता मकोका अंतर्गत कठोर कारवाई शक्य होईल.

राज्यात मागील पाच वर्षांत अमली पदार्थ प्रकरणांमध्ये ७३ हजार गुन्हे नोंदवले गेले असून, १० हजार कोटींहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

या विधेयकामुळे अमली पदार्थांच्या उत्पादन, वाहतूक, वितरण व तस्करीमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांवर कठोर प्रतिबंध लावणे शक्य होणार असून, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित होणार आहे. गृहराज्यमंत्री कदम यांनी अधोरेखित केले की, “युद्धपातळीवर अमली पदार्थांविरोधात कारवाई करण्यासाठी हे विधेयक निर्णायक ठरेल.”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button