Letest News
राहता शहरात गुटख्याचा काळाबाजार तेजीत-सोहेल-अनिकेतच्या कथित गुटखा विक्रीला कोणाचा वरदहस्त? सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांचा निलेश लंकेंकडून पराभव! हजारो लेकींच्या डोक्यावर मायेचा हात ठेवणाऱ्या सुमित्रा काकी काळाच्या पडद्याआड शिर्डीच्या सामाजिक राज... दररोज ५०० रुपये द्या तरच दुकान चालवू देऊ!’ माजी नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा शिर्डीच्या अनाधिकृत बियर बार मध्ये मोठी धाडसात लाखाचे मध्यप्रदेशातिल दारू जप्त चेअरमन विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली साई संस्थान कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! दिवाळीनिमित्त शिधा व म... पैशांचा मोह नाही- कर्तव्याशी इमान! साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचे कौतुक पादुका दर्शन सोहळ्यामुळे शिर्डीच्या दसरा-पुण्यतिथी उत्सवाला ग्रहण?अ‍ॅड. गोकुळ ठुबे यांची चौकशीची माग... प्रारंभ राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी भरती सुरू-पदवीधर तरुणांना रोजगाराची संधी! दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता!
अ.नगरक्राईम

कोपरगावमध्ये मोठी धडक कारवाई! अवैध गुटखा रॅकेटवर LCB ची झडती – 2.43 लाखांचा मुद्देमाल जप्त स्विफ्ट कारसह 4 आरोपींवर गुन्हे दाखल

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीचे जाळे मोडून काढण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिलेल्या निर्देशानुसार दोन ठिकाणी एकाच दिवशी दमदार छापेमारी करून एकूण 2,43,716/- रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. यामध्ये 2 लाखांचा स्विफ्ट कार, विविध गुटखा पाऊचेस, तसेच विक्रीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले.

sai nirman
जाहिरात

🔥 कारवाईची सविस्तर हकीगत

गुटखामुक्त जिल्हा मोहिमेला चालना देत, LCB चे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.
या पथकात पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, सतिष भवर, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड यांचा समावेश होता.

DN SPORTS

गुप्त माहितीच्या आधारे 10 डिसेंबर रोजी कोपरगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत सलग दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले आणि खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली:


📍 प्रकरण क्रमांक 1 — गु.र.नं. 584/2025

कलम : भारतीय न्याय संहिता 123, 223, 274, 275 तसेच 3(5)

आरोपी:

  1. प्रमोद सजन बोथरा, वय 29, रा. शरदानगर, कोपरगाव
  2. मुस्ताक अब्बास सय्यद, रा. येवला – (फरार)

जप्त मुद्देमाल:

kamlakar

₹ 2,00,000/- किमतीची स्विफ्ट कार

₹ 28,080/- किमतीचा गुटखा

एकूण: ₹ 2,28,080/-


📍 प्रकरण क्रमांक 2 — गु.र.नं. 583/2025

कलम : भारतीय न्याय संहिता 123, 223, 274, 275 तसेच 3(5)

आरोपी:

  1. योगेश विजय कटाळे, वय 39, रा. खडकी, कोपरगाव
  2. नामदेव संजय पगारे, वय 19, रा. सुभाषनगर, कोपरगाव

जप्त मुद्देमाल:

₹ 15,636/- किमतीचा गुटखा


👉 एकूण जप्ती : 2 छापे – 4 आरोपी – 2,43,716/- रुपये मुद्देमाल

ही कारवाई पूर्णपणे मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यापारावर पोलिसांचा गुटखा तस्करी करणार्‍यांना हा आणखी एक मोठा धडक बसला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button