Letest News
“माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु... तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी शिर्डी नगरपरिषदेत पं. दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी भाजयुमो शिर्डी शहर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिर्डीत ‘धूमस्टाईल आधी दुचाकी चोरी मग महिलेची रेकी अन् क्षणार्धात सोन्याची चैन लंपास दारूच्या पार्ट्... ‘कॅप्टन’ खरातच्या आर्थिक साम्राज्यावर ईडीचा फास पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! प्रशासनाची गणेश विसर्जनाची एकत्र मिरवणूक. शासकीय योजनाच्या माहिती रथाच्या माध्यमातून साधला लोकसंवाद.
अ.नगरराजकीय

ठाकरे गटातील खासदार फुटीच्या चर्चांना पूर्णविराम-उद्धव ठाकरेंसमोर खासदारांच्या शपथा

मुंबई, दि. १६ : शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील खासदार फुटून संसदेत स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. ठाकरे गटाच्या ९ खासदारांपैकी ५ खासदार बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या अफवा पसरल्याने पक्षात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पक्षाचे नेते संजय राऊत यांनी या सर्व चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट करत वादावर पडदा टाकला आहे.
‘मातोश्री’वर महत्त्वाची बैठक
चार दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर काहींनी दूरस्थ पद्धतीने सहभाग नोंदविला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


खासदारांच्या भावनिक शपथा
बैठकीदरम्यान सर्व खासदारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. आपण पक्षासोबतच राहणार असल्याची ग्वाही देताना अनेक खासदार भावूक झाले.
काही खासदारांनी आई-वडील व मुलांची शपथ घेतली, तर काहींनी आई भवानी, तुळजाभवानी आणि साईबाबांच्या नावाने शपथ घेत पक्षाशी व हिंदुत्वाच्या विचारांशी निष्ठावंत राहण्याचे आश्वासन दिले.
संजय राऊत यांचा टोला
या बैठकीबाबत माहिती देताना संजय राऊत म्हणाले, “ज्याप्रमाणे लोक दूरस्थ पद्धतीने पूजा करतात, त्याचप्रमाणे काही खासदारांनी दूरस्थ माध्यमातून शपथ घेतली. पक्ष सोडण्याचा कोणाचाही विचार नाही.”
यामुळे ठाकरे गटातील खासदार फुटीच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button