Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरराजकीय

“कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात!

शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी–अहिल्यानगर रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी माजी खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार शब्दांत निशाणा साधला आहे. रस्त्याचे काम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे थांबले असल्याच्या कथित विधानावर पिपाडा यांनी सडकून टीका केली.
“अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यामुळे या रस्त्याचे काम थांबले, असे म्हणता? काय बोलतो आपण? कुठे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि कुठे आपण? गल्लीतील फिरणारे, ग्रामपंचायत सदस्यही नसणारे आणि केवळ मंत्र्याचा मुलगा म्हणून ओळख असणारे तुम्ही आता थेट ट्रम्पपर्यंत पोहोचलात,” असा बोचरा टोला डॉ. पिपाडा यांनी लगावला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या वक्तव्यामुळे सर्वसामान्य जनता हसायला लागली असून, “तुमच्यामुळे आमच्या पक्षाची बदनामी व्हायला लागली आहे,” अशा शब्दांत पिपाडा यांनी विखेंना सुनावले.
शिर्डी–अहिल्यानगर मार्ग हा लाखो नागरिक आणि साईभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असताना रस्त्याच्या कामावरून सुरू असलेल्या राजकीय श्रेयवादात आता थेट अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे नाव घेतले जात असल्याने या मुद्द्याला वेगळेच वळण मिळाले आहे.
पिपाडांच्या या थेट आणि बोचऱ्या टीकेमुळे भाजपातील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.
दैनिक साईदर्शनचा सवाल :
रस्त्याचे काम का रखडले याचे उत्तर जनतेला हवे आहे; ट्रम्पचे नाव घेऊन जबाबदारी झटकण्यापेक्षा काम पूर्ण कधी होणार, हे स्पष्ट करा!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button