Letest News
लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल...
क्राईमशिर्डी

मुख्याधिकारी यांनी त्या अतिक्रमण धारकास पाठीशी घातल्याची शंका उत्पन्न?म्हणूनच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आर्थिक देवाणघेवाणाची झाल्याची तक्रार दाखल 

 शिर्डी ( प्रतिनिधी )शिर्डीतील हॉटेल शिर्डी पार्क इन मिनी पंजाब रेस्टॉरंटचे अनाधिकृत बांधकाम न पाडता आर्थिक तडजोड करत असल्याची शंका असल्याने  या अतिक्रमण धारकास पाठीशी घालणारे शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सतिश दिघे  यांच्यावर खातेनिहाय चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते व  पत्रकार जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी एका  निवेदनाद्वारे केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

 त्यांनी या निवेदनात म्हटले की,
 शिर्डी नगर परिषदेच्या हद्दीत पिंपळवाडी रोडवर हॉटेल शिर्डी पार्क इन् मिनी पंजाब रेस्टोरंटचे अनधिकृतपणे नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेता बांधकाम केलेले आहे. त्या हॉटेल मालकाला नगर परिषदेने सन २०१९ साली ३ वेळेस अनधिकृत बांधकाम पाडण्याची लेखी नोटीस दिलेली होती. 

तरीही त्या हॉटेल मालकाने ते अतिक्रमण काढले नाही. त्यावेळी मी ते अतिक्रमण  पाडावे म्हणून शिर्डी नगर परिषदेच्या समोर  ५ दिवस आमरण उपोषण केले होते. त्यावेळी हेच श्री.सतीश दिघे मुख्याधिकारी होते. माझे उपोषण सोडवतांना नगर परिषदेने मला लेखी दिले होते कि,

सदर हॉटेल मालकाचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचे आदेशाने पुढील कारवाई करण्यात येईल आणि तो दावा २०२४ मध्ये न्यायालयाने फेटाळून लावला आणि निकाल नगरपंचायतच्या बाजूने लागला होता म्हणून मी दिनांक १७/०२/२०२५ रोजी संबंधित विभागांना ते अतिक्रमण पाडावे म्हणून अर्ज दिला होता.

तरी ते अतिक्रमण निघाले नाही. मी दिनांक २८/०२/२०२५ व दिनांक ०१/०३/२०२५  रोजी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री सतीश दिघे साहेबांशी त्या अतिक्रमणाबाबत चर्चा केली असता त्यांनी मला लेखी कळवले की ,संबंधित अतिक्रमणाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल परंतु कधी निर्णय घेणार हे सांगितले नाही याचे कारण असे आहे कि त्या हॉटेल मालकाला काही अवधी द्यायचा म्हणजे तो पुन्हा न्यायालयात जाऊन दावा दाखल करेल. 

हे अतिक्रमण पाडू नये यासाठी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचे संबंधित हॉटेल मालकाशी आर्थिक व्यवहार झालेले असल्याची मला शंका झालेली आहे . कारण सन २०१९ सालीही हेच मुख्याधिकारी होते आणि आताही  तेच श्री. सतीश दिघे मुख्याधिकारी आहेत. त्यांनी या  प्रकरणी आर्थिक तडजोड करत अतिक्रमण धारकाला पाठबळ दिल्याचा मला संशय आहे. तेव्हा शिर्डी न.पा.चे  मुख्याधिकारी दिघे यांच्या कारकीर्द बाबत आपल्या कार्यालय मार्फत आर्थिक देवाण घेवाणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.

अशी मागणी जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी या निवेदनातून करण्यात आली असून हे निवेदन  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहिल्यानगर, आदींनाही पाठवण्यात आले आहे. . अशी मागणी जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांनी या निवेदनातून केली आहे 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button