Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
अ.नगरक्राईम

बीड जिल्ह्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातही अवैध धंद्यामुळे वाढली गुन्हेगारी!

शिर्डी ( प्रतिनिधी) बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांप्रमाणेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी कडक निर्णय घेणे महत्त्वाचे असून अवैध धंद्यांच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक कधी ॲक्शन मोडवर येणार? असा सवाल जिल्ह्यातील नागरिकांकडून आता होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाल्मिक कराड याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या समर्थकांनी आंदोलने केली आहेत. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ वाढल्याचं दिसून आलं आहे. मराठा आणि वंजारी समाज यांच्यात आरक्षणावरून आधीच काही संघर्ष असताना संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे प्रकरण आणखी तापताना दिसत आहे.

अशातच जातीय तेढ वाढू नये यासाठी बीडचे एसपी नवनीत काँवत यांनी कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देत एकप्रकारे इशाराही दिला आहे.पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांना शिस्त लावण्यासाठी, त्याचबरोबर जातीयवाद नसावा यासाठी, आता प्रयत्न सुरू केले आहेत.

यापुढे अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना हाक मारताना, त्यांच्या आडनावाऐवजी थेट नावाने हाक मारावी. वर्दीवर असताना रील्स काढून सोशल मीडियावर टाकल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे, त्याचबरोबर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप झाला तर ठाणेप्रमुखाची थेट नियंत्रण कक्षात बदली केली जाईल.

अशा सूचना देत थेट इशारा देखील, यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्याप्रमाणेच अहिल्या नगर जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही असे काही धाडसी निर्णय घेतले पाहिजेत. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे तेजीत सुरू आहेत. व त्यातूनच गुन्हेगारी वाढत जाते. बीड जिल्ह्याचे वातावरण व तेथील परिस्थिती लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्यातही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कडक धोरण स्वीकारले पाहिजे.

बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कधी ॲक्शन मोडवर येणार असा सवाल आता जिल्ह्यातील नागरिक करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध दारू धंदे मटका जुगार अवैध वेश्या व्यवसाय अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अवैध धंद्यातून मिळालेल्या पैशावर दादागिरी गुंडगिरी मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे जिल्ह्यातील हे अवैध धंदे कधी बंद होणार जिल्हा पोलीस अधीक्षक कधी ॲक्शन मोडवर येणार असा सवाल जिल्ह्यातील नागरिक करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button