Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी एक “गेम चेंजर” ठर... गावठी कट्टा घेऊन फिरणारे तिघे जेरबंद- 7.82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत शिर्डीत लोकशाहीचा उघड उघड खून! मतदारांच्या माथी उमेदवार लादणाऱ्यांना शिर्डीकडून थेट इशारा! शिर्डीत ट्रॅव्हल्सची दादागिरी! लहान बाळासह साईभक्त महिलेला मध्यरात्री बसमधून हाकलण्याचा प्रकार — साई... ५१ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगतस्थानिक गुन्हे शाखेने ५७२.७५ ग्रॅम सोनं जप्त करून फिर्यादीस दिला न्... शिर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची निरीक्षक... मालेगावमध्ये अतिक्रमण मोहिमेने शेकडो नागरिक बेरोजगार —मातोश्री हाॅकर्स युनियन संस्थापक जगदीश गो-हेच्... फरार खुनाचा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात!अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली अ... शिर्डीच्या २५ वर्षांच्या राजकीय इतिहासातील भयाण शांतता! अनेक इच्छुक अजूनही आदेशाच्या प्रतीक्षेत-शिर्... शिर्डीतील रस्त्यांची दयनीय अवस्था — खड्डेमय रस्त्यांनी घेतले निष्पापांचे बळी! लोकप्रतिनिधी तथा नामदा...
शिर्डी

निवडणुकीचे वृत्तांकन करतांना आजतक वृत्तवाहिनीचे व्हिडीओ जर्नलिस्टच निधन,पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त

बीड लोकसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई येथून अंबाजोगाई शहरात आलेले ‘आज तक’ वृत्तवाहिनीचे व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव कनगुटकर यांचे दुःखद निधन झाले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आज (सोमवारी) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकस्मात निधनाने पत्रकारिता विश्वासह कुटुंब आणि मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.

kamlakar

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई तकचे वरिष्ठ पत्रकार अभिजीत कारंडे यांच्यासह वरिष्ठ कॅमेरामन वैभव कनगुटकर गेले होते.

अंबाजोगाई येथील राज हॉटेलमध्ये ते वास्तव्याला होते.सकाळी हॉटेलमधून ते निघाले, त्यांनी एका वॉकथ्रूचे शूट केले. मात्र त्यावेळी अस्वस्थ वाटत असल्याने ते गाडीत बसले. मात्र त्यातच त्यांचा करुण अंत झाला.

अत्यंत शांत, संयमी आणि मृदूभाषी स्वभावाचे म्हणून वैभव कनगुटकर कुटुंब, सहकारी आणि मित्र परिवारामध्ये परिचित होते. ते ठाण्यात वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंब, सहकारी शोकसागरात बुडाले आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button