Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरराजकीय

योग व प्राकृतिक चिकित्सा उपचार आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा शिबिर नुकतेच संपन्न!

A free medical camp was recently held by the Yoga and Naturopathy Treatment and Training Center!

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी नजीक सावळीविहीर येथे नवी दिल्ली येथील प्रकृती मंथन या योग व प्राकृतिक चिकित्सा उपचार आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवी दिल्ली येथून आलेल्या योगाचार्य डॉक्टर मंजू यांनी विविध प्रकारच्या रुग्णांवर विना औषध मोफत उपचार केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मागील वर्षीही सावळीविहीर बुद्रुक येथील श्री हनुमान मंदिरात सात दिवस हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. अनेक रुग्णांना या शिबिराचा त्यावेळीही लाभ झाला .त्यामुळे या वर्षीही रुग्णांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तीन दिवसीय शिबिरात अनेक रुग्णांनी सहभाग घेऊन उपचार केले. गुडघा, कंबर, पाय, दुखणे .

अनिद्रा, फेटी लिव्हर , शुगर ,बीपी, आदी आजारावर त्यांनी विशेष मार्गदर्शन करत घरगुती उपचार करत तसेच योगा विषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे प्रत्यक्षात काही रुग्णांवर उपचारही केले. विशेषतः या शिबिरात योगाचे महत्व त्यांनी पटवून दिले. शिर्डी नजीक असणाऱ्या सावळीविहीर बु.येथे या शिबिराला चांगला प्रतिसाद नागरिकांनी दिला

सर्वांनी ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले. त्याबद्दल डॉक्टर मंजू यांनी सर्वांचे धन्यवाद मानले. मागील वर्षी शिबिरात सहभाग घेतलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात फरक पडलेला असल्यामुळे यावेळी अनेक रुग्ण डॉक्टर मंजू यांना प्रत्यक्ष भेटून धन्यवाद देताना दिसत होते.

प्रकृती मंथन ही रजिस्ट्रेशन व सेवाभावी संस्था असून या संस्थेच्या डॉक्टर मंजू ह्या वर्षातून शिर्डीला येतात व सावळीविहीर बु. येथे श्री हनुमान मंदिराच्या सभा मंडपात मोफत वैद्यकीय सेवा शिबिर आयोजित करतात. त्यांचे हे सेवाभावी कार्य पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले.

सावळीविहीर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. तीन दिवसीय या शिबिराचा समारोप नुकताच श्री हनुमान मंदिरात संपन्न झाला. यावेळी सौ. सुनीता गोकुळ जपे, बेबीताई सोनवणे, रवींद्र कापसे, सौ सुमन ताई जाधव, बाबा गायकवाड, आदी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button