Letest News
शिर्डीत अपहरण करून एकाचा खून! या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात! भरत मोरे यांच्या त्या" वादग्रस्त वक्तव्याचा वकील संघाकडून निषेध ! कोल्हार घोटी महामार्गावर कोकणगाव जवळ ट्रक व ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात! तीन ठार! सहा जण गंभीर जखमी! शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून शौकतभाई शेख सह सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान! तर मग साई संस्थान हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख स्वतःकडे का घेत नाही?--आ. संग्राम जगता... शिर्डीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या तरुणांची वाढली संख्या! छत्रपती कॉम्प्लेक्स बनला त्यांचा अड्डा! आधार ... शिर्डीत धारदार शस्त्र बाळगल्याने दोन आरोपींवर गुन्हा दाखल! साईभक्ताची 51 लाखाची फसवणूक केल्या प्रकरणी शिर्डी येथील कुमावत वर दिल्लीतील भक्ताने केला गुन्हा दाखल प्रवेशद्वाराजवळ पूजेचे साहित्य खरेदी केल्याचे बिल दाखवल्यानंतरच पूजेचे साहित्य मंदिरात नेण्यास परवान... sshirdi news उभ्या दोन ट्रक मधून रात्री डिझेलची चोरी करणाऱ्या तिघांना अटक! त्यात सावळीविहीरचे दोन तर...
क्राईमशिर्डी

साईभक्ताची 51 लाखाची फसवणूक केल्या प्रकरणी शिर्डी येथील कुमावत वर दिल्लीतील भक्ताने केला गुन्हा दाखल

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी येथील विजय कुमावत याने दिल्ली येथील साईभक्त यांना ५१ लाखांना गंडा घातला . तशी फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे‌. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नवी दिल्ली येथील मनोजकुमार राजेंद्रकुमार जैन वय-45 यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मी विजय छगनराव कुमावत रा. दत्तनगर शिर्डी ता. राहाता यांच्याकडुन त्यांचे नावे असलेली शिर्डी नगरपंचायतह‌द्दीत दत्तनगर भागात सर्वे नं 9/103 मधे एकुण 10/89 स्क्वेअर फुट जागा असुन त्यावर 4500 स्क्वेअर फुट चार मजली बांधकाम आहे. त्यामध्ये 9 फ्लॅट व त्यांना राहण्यासाठी 1 मजला असे चार मजली बांधकाम आहे. त्यापैकी 9 रुम त्यांनी किरायाने दिलेले आहे. ती इमारत मला साईभक्तांना विनामुल्य सेवामाध्यमातुन घ्यायची होती.


त्याप्रमाणेसुमारे मागील वर्षी दि.01/07/2024 रोजी मी माझे ओळखीचे साईभक्त खंडु गोर्डे यांच्या मार्फत मला विजय छगनराव कु‌मावत यांच्या घराबाबत वरील प्रमाणे माहीती मिळाल्याने मी त्याचा व्यवहार केला व सदरची जागा मला एक कोटी ।। लाख रुपया मधे व्यवहार झाल्याने मी राहाताकोर्टात त्यांच्या सोबत जावुन 100 रु च्या बौंड वर नोटरी करुन घेतली त्यास मी अॅडवास म्हणुन 81,000/- रु कॅश व मोबाईल वरुन 95,000/- रु फोन पे वरुन व 75,000/-रु पेटीएम असे एकूण

2,51,000/-रु त्यास दिले. तसेच राहिलेली रक्कम 1,08,49000/-रु ही दि.11/09/2024 रोजी त्यांना देण्याचेठरले होते. व खरेदीखताप्रमाणेते मला घराचा ताबा देणार असल्याचे ठरले होते. व तसा खरेदी खत करुन देणार असल्याबाबत ठरले होते. सदरच्या जागेवर विजय छगनराव कुमावत यांच्या शिवाय कोणाचाही अधिकार नसल्याबाबत त्यांनी लिहून दिले होते.

तसेच सदरची जागेची त्यांच्याशिवाय कोणीही विक्री करु शकत नाही. व या जागेवर कसल्याही प्रकारचे कुठल्या बँकेचे लोन असल्यास ते मी विजय छगनराव कुमावत भरुन त्याब‌द्दल मी बँकेची एन.ओ.सी घेवुन घरावरील सर्व टॅक्स भरुन निल करुन मीखरेदी करुन देईल.

तसेचखरेदी खतासाठी येणारा खर्च हा मी स्वतः करील अशा प्रमाणे आम्ही राहाता येथे जावुन इंग्रजी मधे त्यांच्या ओळखीच्या वकिलामार्फत नोटरी करुन घेतली व त्यावेळी मी त्यांना जागेचे पेपर मागितले असता ते मला म्हणाले कि आप श्री साई भक्त हो आप दानकर रहे हो,हम आपको पेपर व्हॉट्स अप कर देंगें असेत्यांनी सांगितले होते.

त्यानंतर विजय छगनराव कुमावत यांनी दि.05/07/2024 रोजी व दि.06/07/2024 रोजी मला वर्तमान पत्रात प्रसिध्द केलेली जाहीर नोटीस चे फोटो मला पाठविले. व मला फोन व्दारे कळविले की, मी पेपर मधे जाहीर नोटीस दिली आहे. त्याच्या प्रती आपणास पाठविल्या आहेत. त्यानंतर यांनी मला दोन दिवसांनी फोन केला व मला 25,00,000/-रु मागणी केली त्यावेळी मी त्यांना म्हणालो कि, मी सर्व रक्कम खरेदीखताच्या वेळेस देईल आता मी पैसे देणार नाही.

तर ते मला म्हटले की, माझे बँकेचे लफडे असल्याने मला पैशाची आवश्यकता आहे. जर तुम्ही पैसे दिले नाही तर मी सदरची जागा दुस-याला विकुन टाकेल तुम्ही नोटरी च्या वेळेस दिलेले 2,51,000/-रु बुडुन जातील असे म्हणाले. त्यावरुन मी दि. 15/07/2024 रोजी विजय छगनराव कमावत यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया मधे असलेल्या अकाउंट
आर.टी.जी.एस व्दारे त्यानी दिलेल्या युनियन बैंक अकाउंट नं. 587701980050000नं.34743751541 यामधे 25,00,000/-लाख रु बॅक आर.टी.जी.एस व्दारे टाकले.

त्यानंतर त्याचा मला परत फोन आला व त्याने मला 15,00,000/-रु याची मागणी केली व पैसे न दिल्यास तुम्ही अगोदर दिलेले सर्व पैसे बुडुन जातील असे माझ्याशी मोबाईल वर बोलल्याने व त्याने व्हॉट्स अप वर युनियन बैंक अकाउंट नं. 587701980050000 हा दिल्याने मी त्यास दि. 25/07/2024 रोजी आर.टी.जी.एस व्दारे त्यानी दिलेल्या युनियन बैंक अकाउंट नं. 587701980050000 यामधे 15,00,000/-लाख रु टाकले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा त्याचा मला फोन आला की,

मला पुन्हा 10,00,000/-लाख रु पाठवा रक्षाबंधन चा सण असल्याने मला माझ्या बहिणींना पैसे द्यायचे आहे. त्यांना पैसे दिले नाही तर ते जागा विकण्यास अडथळा निर्माण करतील मला 19/08/2024 च्या
आत पैसे पाठवा नाहितर तुम्ही दिलेले सर्व पैसे विसरुन जा असे म्हणु लागला व त्याने मला व्हॉट्स अप वर बँक ऑफ बडौदा मधील अकाउंट मधे 05,00,000/-लाख रु व त्याने दिलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अकाउंट वर 03.49,000/-रु पाठवले. त्यास मी असे एकुण 51,00,000/-लाख रु दिलेले आहे.

त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मला विजय छगनराव कुमावत यांचा फोन आला व त्याने सांगितले की, मला 15 ते 20 लाख रुपये पाठवुन द्या असे म्हणाल्यावर मी त्यांना म्हणालो की, मी आता पैसे देत नाही खरेदीखताच्या वेळेस मी सर्व पैसे देईल. त्यानंतर मी प्रॉपर्टी डिलरगोर्डे यांच्याशी फोनवर बोललो असता त्यांनी सांगितले की, विजय छगनराव कुमावत हे चीटर असुन त्याचावर बँकेचे लोन आहे.

तुम्ही इथे या म्हणुन मी दि. 03/09/2024 रोजी मी शिर्डी येथे आलो व डिलर सोबत विजय छगनराव कुमावत यांना भेटुन त्यांच्या सह राहाता येथे एका वकिलाकडे गेलो व तेथे जावुन त्यांनी नोटरीच्या कागदावर 51,00,000/-लाख रु मला नकदी व बँक आर.टि.जी.एस व एन.ई.एफ.टी. व फोन पे वरुन मिळाले असे लिहून दिले. व पैसे मिळाल्याची सहीसुध्दा त्याने केली. त्यानंतर मी दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी मला दि.04/09/2024 रोजी व्हॉट्स अप वर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शिर्डी येथे 27,00,000/-लाख रु भरल्याची पावती पाठवली व ही पावती बँकेची एन.ओ.सी आहे

असे खोटे सांगितले व मला पुन्हा 15 ते 20 लाख रुपयाची मागणी करु लागला. त्यावर मी त्यास म्हणालो कि, हि एन.ओ.सी नाही. असे म्हणालो. त्यानंतर मला प्रॉपर्टी डिलरगोर्डे यांचा फोन आला व ते मला म्हणाले की, विजय छगनराव कुमावत याची प्रॉपर्टी युनियन बँकेत मॉडगेज आहे. तुम्ही शिर्डी ला या. त्यावरुन मी शिर्डी येथे आलो व छ. संभाजीनगर येथे जावुन युनियन बँक येथे जावुन विजय छगनराव कुमावत याच्या अकाउंट ची माहिती घेतल्याने नोटरी करुन दिलेले घर हे त्याचे व त्याचे पत्नी च्या नावे मॉरगेज असुन त्याच्यावर 45.42,000/-रु एवढे लोन असल्याबाबत मला महिती मिळाली.

त्यानंतर मी त्यांना वेळोवेळी बँकेची एन.ओ.सी घेवून सदर जागेची खरेदीखत करुन द्या अशी विनंती केली असता त्यांनी मला 5/7 नोटरी प्रमाणे खरेदीखत करुन दिले नाही. व माझ्‌याकडुन वेळोवेळी वरील प्रमाणे पैसे घेवुन माझी फसवणुक केली आहे. अशा आशयाची कायदेशीर फिर्याद विजय छगनराव कुमावत रा. दत्तनगर शिर्डी ता. राहाता जि.अहिल्यानगर यांच्या विरुध् शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल केली आहे .

या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 0641 भारतीय न्याय संहिता कलम 316(2),318(4), 340(2), 336(2) अनवेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button