Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
अ.नगरशिर्डी

प्रवेशद्वाराजवळ पूजेचे साहित्य खरेदी केल्याचे बिल दाखवल्यानंतरच पूजेचे साहित्य मंदिरात नेण्यास परवानगी!

शिडी (प्रतिनिधी)- काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून समजल्या जाणाऱ्या साईनगरीत साईभक्तांना साई समाधी मंदिरात फुलं-हार व प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र गुरुवारी १२ जून 2025रोजी साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने फुलं-हार व प्रसाद बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून भाविकांची लूट थांबवण्याकरिता
पूजेचे साहित्य खरेदी केल्याची पावती प्रवेशद्वारा जवळ दाखवल्यानंतरच साई भक्तांना फुलं हार, प्रसाद नेण्यास मंदिरात परवानगी मिळणार आहे. या निर्णयाचे साईभक्त व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.


कोरोना काळात साई मंदिरात फुलं-हार व प्रसाद बंदी केल्यानंतर दोन ते तीन वर्ष शिर्डीतील फुल विक्रेते व परिसरातील फुल उत्पादक यांना आर्थिक वर्षाचा मोठा सामना करावा लागला होता.
फुलहार, प्रसाद अनेक वर्षानंतर सुरू होताच काही महिन्यातच काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर बंदुकीच्या साह्याने हल्ला करून त्यांना ठार केले होते.

काश्मीर येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या विविध देश व राज्यातून भाविकांची सुरक्षाची काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने साई मंदिरात फुलं-हार व प्रसाद नेण्यास बंदी केली होती. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या पुन्हा खचला होता.

तसेच शिर्डीतील छोटे व्यवसायिक देखील फुलहार, प्रसाद बंदीच्या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडले होते. साई मंदिरात फुलहार व प्रसाद नेण्यास परवानगी द्यावी याकरिता विखे यांनी देखील शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता. अखेर गुरुवारी १२ जून 2025 रोजी साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने फुलहार व प्रसाद बंदीचा निर्णय उठवण्याचा निर्णय घेऊन भाविकांची पूजेच्या साहित्यापासून होणारी लूट थांबवण्याकरिता साई मंदिरात भाविकांना पूजेचे साहित्य घेऊन जाण्यापूर्वी ज्या दुकानात पूजेचे साहित्य खरेदी केले,

त्या दुकानाचे पूजेचे साहित्य खरेदी करण्याचे बिल मंदिर प्रवेशद्वाराजवळ दाखवल्यानंतरच साई समाधी मंदिरात त्या भाविकाला फुलहार व प्रसाद नेण्यास प्रवेश दिला जाईल असा निर्णय घेतला. साई भक्तांकडून जादा दराने पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांना या निर्णयाने चाप बसणार असून या निर्णयामुळे भाविकांची होणारी लूट थांबणार आहे. साई संस्थांनने प्रथमच इतिहासात हा निर्णय घेतल्याने या निर्णयाचे भाविकांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

शिर्डीतील काही दुकानदार भाविकांकडून फुल हार व प्रसाद व इतर पूजेचे साहित्य दर फलक पेक्षा जास्त दर घेऊन विकत असल्याच्या तक्रारी साई संस्थान कडे येत होत्या. भाविकांची लूट थांबवण्याकरिता साई समाधी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना पूजेचे साहित्य खरेदी केल्याचे बिल प्रवेशद्वाराजवळ दाखवल्यानंतरच पूजेचे साहित्य मंदिरात घेऊन जाता येईल अन्यथा जाता येणार नाही. या निर्णयामुळे भाविकांची होणारी लूट थांबणार आहे. असे साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button