Letest News
तलवारीने हल्ला मित्रिणीचा शोध घेत सुरू झाला वाद तरुणावर जीवघेणा वार… नंतर स्कुटी पेटवून दहशत! "दहशतीच्या राजवटीला श्रीरामपूरचा कडाडून विरोध बेग टोळीविरोधात संताप उसळला" गुन्हेगारांचा कर्दनकाळ व्हा!' – राजकीय दबाव झुगारून संघटित टोळ्यांचा बिमोड करा- आयजी संजय येनपुरे या... माजी खासदार विखेंवर अॅड. सुरेश लगड यांचा घणाघाती हल्ला "चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत ठेवा" दैनिक साईदर्शनच्या पाठपुराव्याला यश- पोलीस खात्यातील बोका शंकर चौधरी निलंबित-आता बडतर्फीची मागणी जोर... साईबाबांविरोधातील वक्तव्यावर गौतम खट्टर नमले-राहाता न्यायालयात चूक मान्य-यापुढे आक्षेपार्ह भाष्य करण... घरासमोरच उघडपणे सुरू होता लाखोंच्या उलाढालीचा जुगार अड्डा-स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत रोख रक्कम-मो... दिव्यांगावर दहशत! मारहाण-शिवीगाळ-मोबाईलची तोडफोड- सचिन भैरवकर आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल सावळी विहीरच्या दूध संकलन केंद्रावर एफडीएची धडक कारवाई-परवाना तात्काळ निलंबित साईबाबा रुग्णालयातील स्टाफ नर्स विरुद्ध ७.९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा
अ.नगरक्राईम

“दहशतीच्या राजवटीला श्रीरामपूरचा कडाडून विरोध बेग टोळीविरोधात संताप उसळला”

श्रीरामपूर शहरात घडलेल्या अलीकडील गंभीर घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, बेग टोळीच्या कथित गुन्हेगारी कारवायांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. विविध सामाजिक संघटना, व्यापारी, युवक आणि नागरिकांनी एकत्र येत, संघटित गुन्हेगारीचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
दुखी पित्याने भावना व्यक्त करताना, “बेग टोळीच्या गुन्हेगारांवर मोक्का लावून कायद्यानुसार सर्वात कठोर कारवाई करावी. अशा गुन्हेगारांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत,” असे सांगत प्रशासनाला भावनिक साद घातली.
आमदार ओगले यांनीही आक्रमक भूमिका घेत, “दादागिरी तुमच्या बगलबच्च्यांनाच दाखवा; श्रीरामपूरकर भीक घालणार नाहीत,” असा इशारा दिला. त्यांनी पोलिस प्रशासनाने कोणाचाही मुलाहिजा न ठेवता संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडावे, अशी मागणी केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांनी, “कोणत्याही धर्माच्या किंवा संघटनेच्या नावाखाली गुन्हेगारीला संरक्षण मिळता कामा नये. कायद्यापुढे सर्व समान आहेत,” असे स्पष्ट करत, बेग टोळीच्या कथित गुन्हेगारी कारवायांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
करण ससाने यांनी संघटित स्वरूपात गुन्हे करणाऱ्यांविरोधात, आवश्यक कायदेशीर निकष पूर्ण होत असल्यास, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. शहरातील नागरिकांनीही गुन्हेगारांची दहशत संपवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, बेग टोळीच्या नावाने सुरू असलेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून, दोषींवर कोणती कारवाई करायची याचा निर्णय तपास यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रियेनुसार होणार आहे.

श्रीरामपूर शहराच्या इतिहासात प्रथमच सलग चार दिवस व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळत महा मोर्चात सहभाग घेतला. शहरातील विविध घटक एकत्र आल्याने मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कायदा-सुव्यवस्था मजबूत करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शहरातील गुन्हेगारीला आळा घालावा, या प्रमुख मागण्यांसाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

महा मोर्चानंतर पोलिस प्रशासनाने नागरिकांना निष्पक्ष व कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. आता या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे हीच श्रीरामपूरकरांची अपेक्षा आहे. गुन्हेगार कोणताही असो, कायद्यापुढे सर्व समान आहेत, या तत्त्वावर ठाम राहून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तातडीने आणि प्रभावी पावले उचलण्याची मागणी शहरभरातून होत आहे.

आंदोलनादरम्यान प्रकाश चित्ते यांनी आपल्या मोबाईलमधील काही कथित ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग उपस्थितांना दाखविल्याचा दावा केला. या रेकॉर्डिंगच्या आधारे संबंधित टोळीने फक्त हिंदू मुलींनाच लक्ष्य करून त्यांचे शोषण केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून रेकॉर्डिंगची सत्यता तपासावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button