Letest News
शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या... "गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं" शिर्डीतून नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात वेट एन जॉयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १७ लाखांचे सोने आठ दिवस दडवले-व्यवस्थापन झोपेत होते की मिलीभग... अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त  भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर- शिर्डीत 20 जूनला आंदोलन ‘एक पीडित बहीण-सोबतीला लाखो हिंदू’- शिर... साई संस्थानमध्ये ‘शिस्तीचा बुलडोझर’ CEO गोरक्ष गाडीलकर ॲक्शन मोडमध्ये नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थ... मोहरम सण शांतता-सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया ऑपरेशन टायगर नव्हे टायगरला आधी दात हवेत!"शिर्डीत खासदार अरविंद सावंत यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीक... "मी तिला मारलंय…" मित्राला केलेला फोन ठरला घातक खुनाचा पर्दाफाश-श्रीगोंदा हादरला! तरुणीचा खून करून प...
क्राईमशिर्डी

वेट एन जॉयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १७ लाखांचे सोने आठ दिवस दडवले-व्यवस्थापन झोपेत होते की मिलीभगत होती?

साईनगरी शिर्डीतील वेट एन जॉय वॉटर पार्कमध्ये घडलेला १७ लाख रुपयांच्या सोन्याचा प्रकार हा केवळ हरवलेल्या दागिन्यांचा विषय नसून संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. हरियाणाहून आलेल्या साईभक्ताचे तब्बल १२ तोळे सोने हरवते, वॉटर पार्कमध्ये शोधमोहीम राबवली जाते, पाणीही काढले जाते, पोलिस यंत्रणा रात्रंदिवस तपास करते; मात्र ज्यांना सोने सापडले त्यांनी ते आठ दिवस घरात लपवून ठेवले आणि वॉटर पार्क प्रशासनाला त्याचा थांगपत्ता लागला नाही, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे लाखो पर्यटक येणाऱ्या आणि कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या या वॉटर पार्कमध्ये सापडलेल्या मौल्यवान वस्तू जमा करण्यासाठी नियम, नियंत्रण आणि देखरेख व्यवस्था नेमकी आहे तरी कुठे? एखाद्या कर्मचाऱ्याने १७ लाखांचे सोने स्वतःकडे ठेवले आणि वरिष्ठांना त्याची माहितीच मिळाली नाही, यावर विश्वास ठेवायचा तरी कसा, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


वॉटर पार्क प्रशासन सतत सुरक्षितता आणि शिस्तीच्या गप्पा मारत असते. मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांकडून सापडलेले मौल्यवान साहित्यच सुरक्षित राहत नसेल तर पर्यटकांनी आपल्या कुटुंबीयांच्या आणि वस्तूंच्या सुरक्षेचा विश्वास कोणावर ठेवायचा? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात आणखी एक संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्याने सोने स्वतःकडे ठेवले, पण हा प्रकार इतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक, सुपरवायझर किंवा व्यवस्थापनातील कोणाच्याच लक्षात आला नाही का? की सगळे काही माहित असूनही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला? याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे.


विशेष म्हणजे हा प्रकार वॉटर पार्क प्रशासनामुळे नव्हे, तर शिर्डी पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे उघडकीस आला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली नसती तर १७ लाखांचे सोने कायमचे गायब झाले असते आणि भाविकाला न्याय मिळाला नसता. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांचे कौतुक होत असताना वॉटर पार्क प्रशासन मात्र बचावात्मक भूमिकेत असल्याची चर्चा आहे.
साईनगरीत येणारा प्रत्येक भाविक हा विश्वासाने येतो. मात्र अशा घटना घडत असतील आणि त्या दडपण्याचा प्रयत्न होत असेल तर वेट एन जॉयसारख्या मोठ्या प्रकल्पाच्या प्रतिमेला तडा जाणे अपरिहार्य आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करून भागणार नाही, तर संपूर्ण सुरक्षा आणि देखरेख यंत्रणेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.

१७ लाख रुपये किमतीचे १२ तोळे सोने हरवल्यानंतर अनेकांनी ते कायमचे गेले असेच गृहित धरले होते. वॉटर पार्कमधील पाणी काढूनही सोने सापडले नाही. मात्र शिर्डी पोलिसांनी तपासाची दिशा बदलत गुप्त माहितीच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचून अखेर संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या चिकाटीच्या तपासामुळे साईभक्ताला तब्बल १७ लाखांचे सोने परत मिळाले. अन्यथा हे प्रकरण कायमचे अंधारात राहिले असते.
“जिथे व्यवस्थापन अपयशी ठरले, तिथे शिर्डी पोलिसांनी कर्तव्यदक्षतेचा आदर्श घालून दिला,” अशी भावना नागरिक आणि साईभक्तांमधून व्यक्त होत आहे.
👉 गुन्हेगार कितीही चलाख असला तरी पोलिसांच्या सतर्क नजरेतून सुटू शकत नाही, हे या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 🚔👏

वेट एन जॉय वॉटर पार्कमध्ये १७ लाख रुपये किमतीचे सोने सापडूनही ते आठ दिवस दडवून ठेवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. केवळ संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करून हे प्रकरण संपवू नये, तर वॉटर पार्कचे मालक, व्यवस्थापक, सुरक्षा प्रमुख आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे.
“एखाद्या कर्मचाऱ्याला १७ लाखांचे सोने सापडते, ते अनेक दिवस स्वतःकडे ठेवले जाते आणि व्यवस्थापनाला त्याची माहिती नसते, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.


तसेच भाविकांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करून शासनाने वॉटर पार्कच्या परवान्याबाबतही फेरविचार करावा, अशी मागणी पुढे येत आहे.
“दोषी कोणताही असो, कर्मचारी असो वा व्यवस्थापनातील मोठी व्यक्ती; चौकशीत सत्य समोर आल्यास सर्वांवर समान कारवाई झाली पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया साईभक्त आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button